Dhule Rain Update : धुळे शहरात बरसला पाऊस: ढगाळ वातावरणाने थंडी गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

Dhule Rain Update : धुळे शहरात बरसला पाऊस: ढगाळ वातावरणाने थंडी गायब

धुळे : शहरातील वातावरणात सतत बदल होत आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवस कडाक्याची थंडी पडली. किमान तापमान ५ अंश सेल्सिअसवर आले होते. आता थंडी कमी झाली आहे. त्यामुळे तापमान १८ अंश सेल्सिअस झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी पुन्हा गायब झाली आहे. त्यातच बुधवारी (ता. १४) दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. परिणामी, उकाड्यात वाढ झाली.

हेही वाचा: Dhule News :...अन् भिंतीही बोलू लागल्या!; देसले यांच्या संकल्पनेतून कार्यालयाचे पालटले रूप

मध्यंतरी दोन दिवस रात्रीचे तापमान १० अंशांपेक्षा कमी झाले होते. त्यानंतर किमान ११, तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आले आहे. ढगाळ वातावरण १६ डिसेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहर व परिसरात बुधवारी पावसाचा शिडकावा झाला. वातावरणात अचानक बदल झाला आहे.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण कमी होऊन बुधवारी किमान तापमानाचा पारा जवळपास ७ अंशांनी वाढला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हवेचा वेग कमी असताना १३ अंशांपेक्षा कमी पारा आला नव्हता. मात्र, यंदा पारा ५ अंशांपर्यंत खाली घसरून काही प्रमाणात हवेचा वेग होता. यामुळे गारठा अधिक जाणवत होता. शनिवारी वाऱ्याचा वेग कमी झाला होता. मात्र, बोचरी थंडी जाणवत होती. रविवारी (ता. ११) ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली.

हेही वाचा: Dhule Crime News : वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला LCBने ठोकल्या बेड्या; बनावट चावीने करायचा हातसफाई

नोव्हेंबरप्रमाणे डिसेंबरमध्ये प्रत्येक आठवड्यात वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे काही दिवसांत थंडी व काही दिवस ढगाळ वातावरणाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. याचा आरोग्यावर परिणाम होत आहे.

हेही वाचा: Dhule Crime News : कावठी शिवारात बनावट मद्यनिर्मिती उघड; मुख्य संशयित दिनू डॉन फरार

टॅग्स :Dhulerain