शिवस्मारक म्हणजे भाजपचा भपका - राज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

मनसेतून इतर पक्षांमध्ये गेलेले नगरसेवक भविष्यात पस्तावतील. मनसेने अजून केलेली कामे नाशिककरांना लवकरच दिसतील. नाशिकमध्ये लवकरच बाळासाहेबांच्या व्यंग चित्रांचे दालन उभारण्यात येईल.

नाशिक - अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी भाजपने केलेला भूमिपूजनाचा सोहळा म्हणजे भपका असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (बुधवार) केली.

नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये केलेल्या कामांची माहिती दिली आणि शिवस्मारकावरून पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची सत्ता असलेल्या नाशिकमध्ये राज यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसून येत आहे.

राज म्हणाले, की मनसेतून इतर पक्षांमध्ये गेलेले नगरसेवक भविष्यात पस्तावतील. मनसेने अजून केलेली कामे नाशिककरांना लवकरच दिसतील. नाशिकमध्ये लवकरच बाळासाहेबांच्या व्यंग चित्रांचे दालन उभारण्यात येईल. शहरात मोठ्या प्रमाणात कामे होऊनही नाशिकरांनी दखल न घेतल्यास दुर्दैव म्हणावे लागेल. याठिकाणी विकास कामात खोडा घालण्याचे काम सरकारकडून होते आहे.

Web Title: Raj Thackeray criticize BJP