प्रवाशांना गुलाब देऊन अण्णांच्या आंदोलनाला पाठिंवा

मार्तंड बुचुडे 
मंगळवार, 27 मार्च 2018

राळेगणसिद्धी - प्रवाशांना गुलाबाचे पुष्प व हजारे यांच्या मागण्यांचे पत्रक देऊन एका अनोख्या पद्धतीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. तसेच हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नगर-पुणे महामार्गावर राळेगणसिद्धी फाट्यावर सकाळी साडेदहा वाजता सुमारे 20 मिनिट रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाचे प्रवाशांनीही कौतुक केले. 

राळेगणसिद्धी परिवार तसेच पारनेर तालुक्यातील अनेक तरूण कार्यकर्ते, महिला व पुरूषांनी या आंदोलनात ऊत्पुर्तपणे सहभाग घेतला. या वेळी नायब तहसीलदार माळी व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी मागण्यांचे निवेदन देऊन प्रवाशांची गैरसोय नको या हेतूने हे आंदोलन 20 मिनिटातच मागे घेतले.     

या वेळी वहानांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वहानचालकांना तसेच आतील प्रवाशांना कार्यकर्त्यांनी एक गुलाब पुष्प व एक निवेदन देऊन हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा द्या अशी विनंती केली. तसेच हजारे यांचे आंदोलन सामान्य जनता, शेतकरी व देश हितासाठी आहे असे कार्यकर्ते प्रवाशांना समजाऊन सांगत होते. हजारे यांच्या दिल्ली येथील ऊपोषणाचा आज पाचवा दिवस आहे गेली पाच दिवसात हजारे यांचे वजन मोठ्या प्रमाणात घटले आहे. तसेच त्यांच्या वाढत्यावयाचा विचार करूऩ सरकारने लवकरात लवकर हजारे यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढावा अशी मागणी या वेळी आंदोलनकर्त्यांनी केली.     

या वेळी माजी राळेगणचे ऊपसरपंच लाभेष औटी, माजी सरपंच जयसिंग मापारी, सभापती गणेश शेळके, आण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल शिंदे, संजय वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्य़क्ष दादासाहेब पठारे, अशोक सावंत, सबाजी गायकवाड, शंकर नगरे, सोन्याबापू भापकर, संतोष खोडदे, ऊत्तम पठारे,सुभाष पठारे, रमेश औटी, विलास औटी, अरूण भालेकर गणेश आवारी, मंगल मापारी, सुवर्णा धाडगे, भिमा पोटे, संतोष शेळके, अशोक शेळके, आदींसह मोठ्या संखेने महिला व कार्यकर्ते ऊपस्थीत होते.

Web Title: ralegansiddhi anna hazare hunger strike