सांस्कृतिक रॅली ठरली आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

धुळे - ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा’ अशी रणदुदुंभी गर्जना करीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याकाळी तरुणांमध्ये चैतन्य पेटविले. ठोशास ठोशा देण्याची भूमिका सुभाषचंद्र बोस यांनी घेतली होती. त्यामुळे देश स्वतंत्र होण्याच्या प्रक्रियेत त्यांचे योगदान विसरता येणार नाही, अशी भावना व्यक्त करीत येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेतर्फे त्यांना अभिवादनासाठी आज शहरातून सांस्कृतिक रॅली काढण्यात आली. मिरवणुकीतील चिमुरड्यांच्या वेशभूषेतील सुभाषबाबू, तसेच सजीव देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

जयहिंद शैक्षणिक संस्थेतर्फे दर वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जातात. यंदाही शहरातून भव्य सांस्कृतिक शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत जयहिंद संस्थेतील विद्यार्थ्यांनी लेझीम, गरबा पथकासह विविध लोककला सादर करत नागरिकांची मने जिंकली. संस्थेच्या जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, झेड. बी. पाटील महाविद्यालय, राजे छत्रपती संभाजी विद्यालयाचे विद्यार्थी तसे प्राध्यापक, शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी व सभासद, पालक सहभागी झाले होते.

गल्ली क्रमांक सहामधील सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून जयहिंदच्या पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण साळुंखे, संचालक अजित मोरे, ॲड. आय, जी. पाटील, प्रा. सुधीर पाटील, प्रदीप भदाणे, एन. एन. पाटील, हिरामण गवळी, रत्नाकर बडगुजर आदी उपस्थित होते. प्रारंभी जयहिंद हायस्कूलमध्ये सकाळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. रॅलीत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा केल्या होत्या. यात विद्यार्थ्यांनी टिपरी, लेझीम नृत्य, आदिवासी, गोंधळी, जोगवा आदी नृत्य सादर केले. जयहिंद हायस्कूलपासून सुरू झालेली शहरातील विविध मार्गांवरून नेण्यात आली.

Web Title: Rally in cultural attractions