esakal | 'राज ठाकरे पॉलिटिकली शून्य, भाजप राजसोबत गेल्यास मी विरोधात' 
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही. इंदू मिलची पाहणी झालेली असून पाठपुरावा चालू आहे. इंदू मिलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे.

'राज ठाकरे पॉलिटिकली शून्य, भाजप राजसोबत गेल्यास मी विरोधात' 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भाजपला मनसेचा फायदा नाही. राज ठाकरे पॉलिटिकली शून्य आहेत. राज ठाकरेंबरोबर भाजप असेल तर मी विरोधात जाईन. नाइट लाइफमुळे गुन्हेगारीला आमंत्रण मिळणार आहे. महिलांनाही मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे. म्हणून नाइट लाइफला विरोध आहे, असे केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाशिक रोड येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात रविवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. 

सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देण्याची मागणी

आठवले म्हणाले, की मी जोपर्यंत मोदींबरोबर आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला बौद्धांची मते मिळणे शक्‍य नाही. इंदू मिलची पाहणी झालेली असून पाठपुरावा चालू आहे. इंदू मिलचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील आहे. मुस्लिम समाजाला बळीचा बकरा केले जात आहे, म्हणून या देशाला कायदा समजून घेण्याची आवश्‍यकता आहे, असे ते म्हणाले. 

loading image