नाशिक: प्रेमसंबंधातून विवाहितेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नाशिक : लग्न करण्याचे आमिष दाखवून,  इसमाने 30 वर्षीय विवाहितेवर बलात्कार करीत तिच्या मुलाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. 

नाशिक : लग्न करण्याचे आमिष दाखवून,  इसमाने 30 वर्षीय विवाहितेवर बलात्कार करीत तिच्या मुलाला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. 

घटनेतील पीडित विवाहिता 30 वर्षांची असून, तिला एक लहान मुलगा आहे. पीडित वीवाहितेची ओळख संशयित अशोक साहेबराव बहिरट ( 40, रा. अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक) याच्याशी झाली. 6 जानेवारी 2010 ते 5 ऑगस्ट 2018 या दरम्यान संशयित अशोक बहिरट याने विवाहितेशी झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध प्रस्थापित केले. तर अशोक बहिरट याने पहिल्या पत्नीला सोडून दिले होते. त्यानंतर 30 वर्षीय विवाहितेला “लग्न करणार का व माझ्या मुलाला सांभाळणार का,” असे विचारले. त्यावरून पीडितेने त्याला होकार दिला. संशयित अशोक बहिरट याने दिंडोरी रोडवरील आकाश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या गर्गे पार्कमध्ये खोली घेतली आणि तेथे त्याने विवाहितेवर बलात्कार करून शोषण केले.

दरम्यान, संशयिताने सात वर्षांपासून सोबत राहूनही विवाह न केल्याने पीडित विवाहितेने अशोक बहिरट याच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, तर संशयिताने विवाहितेसह तिच्या लहान मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

Web Title: rape case in Nashik