कॉंग्रेसच्या घोळामुळे भाजपसोबत जाण्याचा निर्णय : आमदार अनिल पाटील 

anil patil amlaner
anil patil amlaner

जळगाव : मी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा सोबत आहे. काल सत्ता स्थापन करण्याचा दावा करण्याचा सर्वच राष्टवादीच्या आमदारांचा मुड होता. परंतु कॉंग्रेसने जो घोळ घातला; त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा रात्री दीड वाजता निर्णय घेतला असल्याचे अमळनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. 

अनिल भाईदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्वच आमदारांचा सत्तेत जाणाच्या निर्णय होता. काल (ता.22) तीन पक्षांची बैठक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा निर्णय होईल अशी अपेक्षा होती. परंतु कॉंग्रेसच्या मागण्या वाढतच होत्या. यामुळे रात्री उशीरापर्यंत निर्णय झालाच नाही. मात्र पक्षाचे सर्व आमदार याला कंटाळले होते. कॉंग्रेसचा जर निर्णय झाला नसता; तर शिवसेना भाजपसोबत जाण्याची शक्‍यता होती. त्यामुळे रात्री उशीरा अजित पवारांशी चर्चा करून आमदारांनी हा निर्णय घेतला. सकाळी सात वाजता 15 आमदार राज्यपालासमोर उपस्थित होते. आणखी 22 आमदारही येत आहे. मी सुध्दा अजितदादा सोबत आहे. मी निर्णय घेतला आहे, नशीब नेईल तिकडे मी जाईन. आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजितदादा सोबत आहे. आज आम्ही सर्व आमदार सोबत आहोतच. 

तर शिवसेना भाजपसोबत असती 
आज ही सत्ता स्थापन झाली नसती, तर शिवसेना भाजपसोबत गेली असती असा धक्कादायक खुलासा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमळनेर येथील आमदार अनिल भाईदास पाटील यानीं "सकाळ'शी बोलताना केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com