धुळे- रावेर (ता. धुळे) येथील गट क्रमांक ८० पैकी सरकारी गटात पोकलॅण्डद्वारे १५ हजार ब्रास गौणखनिजाचे अवैध उत्खनन आणि विनाक्रमांकाच्या मिनी डंपरद्वारे मुरुमाची अवैध वाहतूक झाल्याचा एक अहवाल तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांनी अपर तहसील कार्यालयास सादर केला. मात्र, १५ हजार ब्रास गौणखनिजाचे एका दिवसात अवैध उत्खनन व वाहतूक झाली की नेमका किती दिवसात हा सर्व प्रकार घडला, याचा उल्लेख त्या अहवालात केला गेला नाही.