
धुळे- फागणे (ता. धुळे) येथे माहेरी आलेल्या विवाहितेवर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या रवींद्र सोनवणे (रा. अजंग, ता. धुळे) याला न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडितेला अजूनही पोटात त्रास होत असल्याने तिच्यावर कोणताही मोबदला न घेता मोफत शस्त्रक्रिया करावी, असे आदेशही न्यायालयाने दिले.