मंदीत कशी घेणार पाच ट्रिलियनकडे झेप?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

एका बाजूला पाच वर्षांत अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आणि दुसरीकडे जागतिक मंदीसदृश वातावरणात रेंगाळणारी अर्थव्यवस्था, अशा पार्श्‍वभूमीवर सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सहभागातून अर्थचिंतन सुरू करत, सूचना संकलनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून देशात सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांत कल्पनाविस्तार सुरू झाले.

नाशिक - एका बाजूला पाच वर्षांत अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत वाढविण्याचे केंद्र सरकारचे धोरण आणि दुसरीकडे जागतिक मंदीसदृश वातावरणात रेंगाळणारी अर्थव्यवस्था, अशा पार्श्‍वभूमीवर सरकारने राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सहभागातून अर्थचिंतन सुरू करत, सूचना संकलनाचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रविवारपासून देशात सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांत कल्पनाविस्तार सुरू झाले.

आतापर्यंत केंद्र स्तरावर आर्थिक धोरण ठरत असे, तर प्रादेशिक स्तरावर त्याच्या अंमलबजावणीचे आदेश सुटायचे. त्यात बदल करत, आता प्रादेशिक स्तरावर शहरांमध्ये चार ते पाच जिल्ह्यांतील प्रत्येक राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांना एकत्र बसविण्यात आले आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक गतीसाठी कल्पक प्रयोगांची माहिती सुचवायची आहे. प्रादेशिक कल्पनांवर, राज्य स्तरावर आणि त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या कल्पना, सूचना एकत्रित करून त्यातून बॅंकांच्या कामाची प्रमाणित पद्धत (एसओपी) ठरणार आहे. यानुसार आज येथे स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, युनायटेड बॅंकेसह विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या दोनशेवर व्यवस्थापकांचा आर्थिक विकासावर खल सुरू झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recession Economic Central Government Policy