चित्रकला ग्रेड परिक्षांच्या निकालाबाबत सावळागोधळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

एकलहरे(नाशिक) : कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या चित्रकला ग्रेड परिक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. तसेच दोन वर्षांपासुन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रेही मिळाली नाहीत. त्यामुळे कला शिक्षक व विद्यार्थी चिंतेत आहेत. लवकरात लवकर चित्रकला ग्रेड परिक्षांचे निकाल जाहीर करावेत व मागील दोन वर्षांचे प्रमाणपत्र देण्यात यावे ,अशी मागणी 'व्हिजन नाशिक विभागिय कला शिक्षक संघाचे' जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सांगळे यांनी केली आहे.

शासकिय चित्रकला परिक्षा 'इंटरमिजिएट' पास झालेल्या विद्यार्थ्यांना एसएससी परिक्षा पास होतांना गेल्या दोन वर्षांपासुन अतिरिक्त गुण दिले जात आहेत. पहिल्या वर्षी 'अ' श्रेणीसाठी १५, 'ब' श्रेणीसाठी १०, व 'क' श्रेणीसाठी ५ अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र एकाच वर्षात निर्णय बदलुन गुण कमी करण्यात आले. ७,५,३ असे श्रेणीनुसार गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच इंटरमिजिएट सोबत एलिमेंटरी परिक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्यात आले.

या निर्णयाचा मागील दोन्ही वर्षी विद्यार्थ्यांना भरपुर फायदा झाला. चित्रकला परिक्षांना महत्व प्राप्त झाले. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. त्यामुळे कलासंचालनालयावर कामाचा ताण वाढला. त्यामुळे अजुनपर्यंत २०१८ च्या परिक्षांचा निकाल लागलेला नाही.तसेच विद्यार्थ्याना दोन वर्षांपासुन प्रमाणपत्रेही मिळालेली नाही.

चालु वर्षी परिक्षार्थी विद्यार्थ्यांना बोर्डाकडुन अर्ज करण्यासाठी १५ डिसेंबर २०१८  व विद्यालयातर्फे प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१९ देण्यात आलेला आहे. मात्र अजुनही संबंधित केंद्रांना परिक्षांचे निकाल मिळालेले नाहित. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक विवंचनेत असुन लवकरात लवकर निकाल जाहीर करावे. मागील दोन वर्षांचे प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी व्हिजन नाशिक विभागिय कला शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सांगळे यांनी केली आहे.

Web Title: Regarding drawing of grade examinations mess up