New Voter Registration : वर्षभरात 16 हजार नवीन मतदारांची नोंदणी

जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात तब्बल १६ हजार मतदार वाढले
voter registration
voter registrationEsakal

New Voter Registration : जानेवारी ते डिसेंबर २०२३ या वर्षभरात शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघात तब्बल १६ हजार मतदार वाढले असून, शहादा विधानसभा मतदारसंघात आता एकूण तीन लाख ४० हजार ७०२ मतदारसंख्या झाली आहे. ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही माध्यमांतून मतदारयादीत आता नाव नोंदवता येते.

त्यात मतदार नोंदणीचे अविरतपणे सुरू असलेल्या कामामुळे नवीन मतदार नोंदणी संख्या वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. (Registration of 16 thousand new voters in year nandurbar news)

मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदारयादीचे अद्ययावतीकरण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यामुळे कोणत्याही निवडणुकीआधी अद्ययावत मतदारयादी प्राप्त होत असते. ज्या तरुण-तरुणींचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे त्यांना मतदारयादीत नाव नोंदविता येते.

त्यात जनजागृतीमुळे मतदार नोंदणीकडे कल वाढला आहे. त्यातच महसूल विभागातील कर्मचारी व केंद्रस्तरीय मतदान अधिकारी यांच्या परिश्रमामुळे मतदार नोंदणी करणे सुलभ झाल्याने मतदार नोंदणी वाढल्याचे म्हटले जाते.

त्यामुळे शहादा-तळोदा मतदारसंघात १ जानेवारी ते डिसेंबर २०२३ या एक वर्षाच्या कालावधीत १६ हजार ९० मतदारांनी फॉर्म क्रमांक सहा भरून मतदार नोंदणी केली आहे. त्यात तळोदा तालुक्यातील पाच हजार ९९९

तर शहादा तालुक्यातील दहा हजार ९१ नवीन मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे आता तळोदा तालुक्यातील एकूण मतदारांची संख्या डिसेंबर २०२३ अखेर एक लाख २६ हजार ९५१ झाली आहे. यात ६३ हजार २६८ स्त्रिया, तर पुरुष मतदार ६३ हजार ६८३ आहेत.

voter registration
Jalgaon News : पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी लेखणी झिजवा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

शहादा तालुक्यातील एकूण मतदारांची संख्या दोन लाख १३ हजार ७५१ असून, स्त्री मतदार एक लाख सात हजार ९९८, तर पुरुष मतदार एक लाख पाच हजार ७५० व इतर तीन मतदार आहेत. त्यामुळे एकूण मतदारांची संख्या तीन लाख ४० हजार ७०२ झाली आहे. त्यात स्त्रिया एक लाख ७१ हजार २६६ व पुरुष एक लाख ६९ हजार ४३३ व इतर मतदार तीन आहेत.

२०२४ हे वर्ष लागल्याने या वर्षाला लोकसभा, विधानसभा तसेच शहादा तळोदा पालिका यांच्या निवडणुकांचे वर्ष समजले जात आहे. त्यामुळे मतदार नोंदणी महत्त्वाची मानली जात आहे. त्यात नव्याने वाढलेले १६ हजार ९० मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकणार यावरदेखील निवडणुकीच्या निकाल अवलंबून राहू शकत असल्याचे बोलले जात आहे.

त्यात मतदान नोंदणीसाठी ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने मतदारांची नोंदणी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे लोकशाहीप्रेमी नागरिकांनी या मतदार नोंदणीचे स्वागत केले आहे.

voter registration
Eknath Khadse News : गिरीश महाजनांनी आपल्याविरुद्ध लोकसभा लढवावी : एकनाथ खडसे

शहादा तळोदा मतदारसंघ

स्त्रिया- १,७१,२६६

पुरुष- १,६९,४३३

इतर- ३

एकूण मतदार ३,४०,७०२

नवीन नोंदणी झालेले मतदार

तळोदा तालुका- ५,९९९

शहादा तालुका- १०,०९१

एकूण- १६,०९०

voter registration
Lok Sabha Elections : जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढणार; जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com