मालमत्ता सर्वेक्षणाच्या मुदतवाढीला नकार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नाशिक - महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सध्या शहराच्या विविध भागांत मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू आहे. जुलैअखेर सर्वेक्षण पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण सर्वेक्षणाचा वेग लक्षात घेता काम नियोजित वेळेत काम पूर्ण होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी वेळेत काम पूर्ण करा. मुदतवाढ मिळणार नसून दंडात्मक कारवाईची सूचना त्यांनी केली.

नोएडा येथील जिओ कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. सध्या शहरात पावणेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे. शिवाय अनेक भागांत निवासी क्षेत्राचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो, तर मालमत्तांचे मोजमाप कमी दर्शविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करत सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे. जानेवारी ते मेपर्यंत अडीच लाख मालमत्तांचे सर्वेक्षण अपेक्षित होते. आतापर्यंत पश्‍चिम, सातपूर व सिडको विभागात फक्त दीड लाख मालमत्तांचे मोजमाप झाले आहे. जुलैअखेर काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सभापतींचे वॉटरमीटर काढले
शहरात वॉटर ऑडिट सुरू आहे. सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या निवासस्थानातील पाण्याचे मीटर काढून घेतल्याने सर्वेक्षणाचा कुठला प्रकार आहे, याबाबत माहिती जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देताना अस्तित्वात असलेले मीटर काढून ऑडिटर कंपनीतर्फे सात दिवसांसाठी त्यांचे मीटर तेथे लावले जाते. त्या माध्यमातून पाण्याचा प्रत्यक्षात वापर महापालिका कळविला जात असल्याची माहिती देण्यात आली.

जलशुद्धीकरण केंद्रावर बंदूकधारी रक्षक
पाच जलशुद्धीकरण केंद्रांवर सुरक्षारक्षक नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षारक्षक नियुक्त करताना बंदुकधारी हवेत, अशी मागणी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केली. सुरक्षारक्षक मंडळाकडेच मागणी केली जाईल. सुरक्षा मंडळाकडून रक्षक न मिळाल्यास ई-निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषतः पंचवटी भागातील केंद्रावर सुरक्षितता महत्त्वाची असल्याने प्रथम तेथे रक्षक तैनात केले जाणार आहेत. बाराबंगला केंद्र पोलिस प्रशिक्षण केंद्राला लागून असल्याने त्यांना संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Web Title: Rejecting the deadline for asset surveys