Municipal Corporation News : धोकादायक इमारती स्वखर्चाने काढून घ्या; महापालिकेकडून नोटीस

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : शहरातील धोकादायक इमारतधारकांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. प्रारंभी जाहीर नोटिशीद्वारे संबंधितांनी आपापल्या धोकादायक इमारती अथवा धोकादायक इमारतीचा पडावू भाग स्वखर्चाने काढून घेण्याचे बजावले आहे.

दरम्यान, सध्या धोकादायक इमारतींबाबत सर्वेक्षण सुरू असून, संबंधितांना वैयक्तिक नोटिसादेखील बजावण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळ्यात धोकादायक इमारती पडून वित्त व जीवितहानी होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे महापालिकेकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी अशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून संबंधितांना नोटिसा बजावण्याचा सोपस्कार केला जातो. (Remove dangerous buildings at your own expense Notice from Municipal Corporation Personal notices will also be issued after survey Dhule News)

Dhule Municipal Corporation
NMC News : उजव्या कालव्यावरील अतिक्रमण हटविणार; पाणीपुरवठा विभागाकडून पत्र

यंदाही धुळे महापालिकेकडून ही कार्यवाही सुरू आहे. वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस प्रसिद्ध करून धोकादायक इमारतधारकांना त्या काढून घेण्याचे बजावले आहे.

शासन परिपत्रक ५ नोव्हेंबर २०१५ नुसार व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६४ अन्वये आपल्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारती तसेच इमारतीसंदर्भात पडावू धोकादायक असलेला भाग, इमला अथवा संपूर्ण इमारत परिसरातील रहिवासींना, रस्त्यावरून येणाऱ्या, जाणाऱ्या कुठल्याही जीवितास हानी न पोचविता स्वखर्चाने उतरविण्याची कार्यवाही करावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

दरम्यान, महापालिका क्षेत्रात मागील वर्षापर्यंत सुमारे शंभर धोकादायक इमारती होत्या, यंदा याबाबत सर्वेक्षण सुरू असल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना वैयक्तिक स्तरावरदेखील नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Jalgaon NCP News : संजय पवार अखेर राष्ट्रवादीतून बडतर्फ

धुळे शहरात विशेषतः जुने धुळे भागात धोकादायक इमारतींचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. याशिवाय शहरात ठिकठिकाणी आजही जुन्या लाकडी इमारती उभ्या असल्याचे पाहायला मिळते. या इमारती कधी पडून येतील हे सांगता येत नाही.

जुने धुळे भागात धोकादायक इमारतींमध्ये कुटुंब राहत असल्याचेही पाहायला मिळते. या इमारतींच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने कौटुंबिक वाद, न्यायप्रविष्ट प्रकरणेही असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे संबंधित कुटुंबे इमारती सोडायला तयार होत नाहीत. दरम्यान, काही भागात विशेषतः व्यावसायिक व रस्त्यावरील जुन्या इमारती पाडून तेथे नवीन बांधकामे सुरू असल्याचेही पाहायला मिळते. काही ठिकाणी मात्र धोकादायक इमारती उभ्या असल्याचेही दिसते. त्या वेळीच पाडून संभाव्य दुर्घटना टाळण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करण्याऐवजी ठोस कार्यवाहीची गरज व्यक्त होते.

Dhule Municipal Corporation
Jalgaon News : मायादेवी मंदिराला दुर्मिळ गोरख चिंचेची शीतल सावली; औषधीदृष्ट्याही उपयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com