दिवाळीपूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड व बाह्य रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर नाशिककरांना दिवाळीपूर्वी शहरांतर्गत रस्ते चकाचक पाहायला मिळणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 32 कोटींचे रस्तेदुरुस्ती, निर्मितीचे प्रस्ताव सादर झाले आहेत. 

नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्यात रिंगरोड व बाह्य रस्त्यांची निर्मिती झाल्यानंतर नाशिककरांना दिवाळीपूर्वी शहरांतर्गत रस्ते चकाचक पाहायला मिळणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे 32 कोटींचे रस्तेदुरुस्ती, निर्मितीचे प्रस्ताव सादर झाले आहेत. 

शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काही वर्षांत शहरांतर्गत नवीन नगरे वसली आहेत. मात्र, त्या भागात कच्च्चा रस्त्यांवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागतो. कॉलनीतील रस्त्यांवर दहा वर्षांपूर्वी डागडुजी झाली होती. त्यानंतर फक्त खड्डे बुजविण्याचे काम आतापर्यंत झाले होते. सिंहस्थ कुंभमेळ्यात 90 किलोमीटरचे रिंगरोड तयार झाले. मात्र, अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांकडून तक्रारींचा ओघ सुरूच होता. नगरसेवकांना रोषाला सामोरे जावे लागते होते. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात कॉलनी अंतर्गत रस्ते दुरुस्तीची कामे सुचविली होती. पावसाळ्यात रस्ते उखडले जाण्याची शक्‍यता गृहीत धरून त्यानंतर कामे करण्याचे नियोजन होते. त्यानुसार सुमारे 32 कोटींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. खडीचे कच्चे रस्ते दुरुस्त करणे, डांबरीकरण व खडीकरणाचा यात समावेश आहे.

अशी आहे तरतूद
कच्च्या रस्त्यांवर खडीकरण व डांबरी रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पूर्व विभागात सुमारे सहा कोटी 30 लाखांची तरतूद आहे. पश्‍चिम विभागात चार कोटी 48 लाख रुपये, पंचवटीत चार कोटी 47 लाख, नाशिक रोडसाठी चार कोटी 40 लाख, सिडकोत पाच कोटी 66 लाख, तर सातपूर विभागासाठी सहा कोटी 72 लाखांची तरतूद केली आहे.

Web Title: Repair of roads in the city before Diwali