ज्येष्ठ पत्रकार हेमंत कुलकर्णी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नाशिक - 'लोकमत'चे सहयोगी समूह संपादक, ज्येष्ठ पत्रकार हेमंत दत्तात्रेय कुलकर्णी (वय 66) यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी कालिंदी, मुलगी मुग्धा शहा व प्राजक्ता जडे, तीन भाऊ असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. उद्या (ता. 3) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लालित्यपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी मिळविल्यानंतर मुंबईत लोकसत्तामधून त्यांनी पत्रकारितेला सुरवात केली. 1982-83 पासून ते नाशिकला लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी होते. भाष्य, स्तंभलेखनातही त्यांचा हातखंडा होता. डिसेंबर 2003 मध्ये त्यांनी नाशिक लोकमतच्या संपादकपदाची सूत्रे स्वीकारली होती. गेल्या वर्षीच त्यांची सहयोगी समूह संपादक पदावर नियुक्ती झाली होती.

Web Title: reporter hemant kulkarni death