Republic Day : भारतीय प्रजासत्ताकाचा दुबईत डंका!

republic day
republic dayesakal

शिंदखेडा (जि. धुळे) : विविध क्रांतिकारकांच्या वेशभूषेसह देशभक्तिपर गीते आणि विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाचा डंका दुबईतील (Dubai) आबुधाबीमधे गाजला. (Republic Day was celebrated in Dubai with patriotic songs various programs including revolutionary costume dhule news)

दुबईत असणाऱ्या महाराष्ट्रीय आणि त्यातल्या त्यात खानदेशी नागरिकांनी ‘खानदेश महोत्सव’ आयोजित केला होता. त्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. दोनशे कुटुंबांनी महोत्सवात सहभाग घेऊन भारतीय प्रजासत्ताक दिनाचा आनंद लुटला.

महोत्सवात छोट्यांसह मोठ्यांनी स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा करून विविध नाटिका आणि देशभक्तिपर गीते सादर केली. लहान मुले विविध खेळ खेळले. त्यांच्यासोबतच मोठ्यांनी मैदानी खेळांचा आनंद लुटला. चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

republic day
MPSC New Syllabus : अभियांत्रिकी, वन, कृषीसाठी नवीन अभ्यासक्रम; 2023 पासूनच लागू करण्याची तयारी

या स्पर्धेतूनही देशप्रेम व्यक्त केले गेले. कायक्रमाचे आयोजन भूषण चौधरी, महेश जायखेडकर, घनश्याम पाटील, राहुल पाटील, गणेश बोरसे, चंद्रशेखर जाधव, योगेश पगार यांनी केले. फॅशन शोसाठी मोहिनी अमृतकर, पल्लवी अमृतकर, स्वाती भोळे, कमलेश जगताप, सायली पाटील, दीपाली चौधरी, योगेश गाजरे, योगेश अमृतकर व पीनल चौधरी, सुचिता भामरे, आमशष भोळे, अनिल वायकर, संजय पाटील, चेतन जावळे, अमोल भामरे, मनोज बागल यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी अहिराणी गाण्यांवर ठेका धरला.

republic day
Nashik Air Service : Indigoतर्फे 15 मार्चपासून गोवा, अहमदाबाद, नागपूरला रोज उड्डाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com