सिडको अंबड परिसरातील निकाल 90 ट्क्याच्या पुढे

विलास पगार
शनिवार, 9 जून 2018

सिडको - परिसरातील विविध शाळांचा दहावीचा निकाल 90 टक्क्यांच्या पुढे लागला आहे. सेंट लॉरेन्स या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

केबीएच विद्यालय, पवननगर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पवननगर येथील केबीएच विद्यालयाचा निकाल 98.52 टक्के लागला आहे. अनिकेत हेमंत सोनजे हा 98.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला तर साक्षी पुरुषोत्तम जगदाळे हिला 94.40 टक्के गुण मिळून द्वितीय आली. तर अक्षय गोरक्षनाथ पवार व यश भालचंद्र जगताप हे 93.80 टक्के गुण मिळवून तृतीय आले. मुख्याध्यापक भगवान कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सिडको - परिसरातील विविध शाळांचा दहावीचा निकाल 90 टक्क्यांच्या पुढे लागला आहे. सेंट लॉरेन्स या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

केबीएच विद्यालय, पवननगर महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित पवननगर येथील केबीएच विद्यालयाचा निकाल 98.52 टक्के लागला आहे. अनिकेत हेमंत सोनजे हा 98.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला तर साक्षी पुरुषोत्तम जगदाळे हिला 94.40 टक्के गुण मिळून द्वितीय आली. तर अक्षय गोरक्षनाथ पवार व यश भालचंद्र जगताप हे 93.80 टक्के गुण मिळवून तृतीय आले. मुख्याध्यापक भगवान कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जनता विद्यालय, पवननगर
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या पवननगर येथील जनता विद्यालयाचा निकाल 99.39 टक्के लागला असून नेहा चंद्रभान काळे ही 98 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर निखिल केशवराव आहेर हा 97.20 टक्के गुण मिळवून प्रथम आला. अपूर्वा बाळू पाटील ही 97 टक्के गुण मिळवून तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक नानासाहेब महाले, शालेय समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील, मुख्याध्यापिका कल्पना सोनवणे, पर्यवेक्षक के.एस.सूर्यवंशी, आर.ए.शेळके, बी.के.भामरे, एस.एच.सोनवणे, व्ही.एम.मोगल, आर.ए.गायकवाड, बी.डी.रौंदळ यांचे मार्गदर्शन लाभले.

मॉडर्न हायस्कूल, जुने सिडको
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या जुन्या सिडकोतील मॉडर्न हायस्कूलचा निकाल 90.38 टक्के लागला आहे. वैष्णवी सतीश सोनवणे ही 91.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर साहील संतोष मुर्तडक हा 90.20 टक्के गुण मिळवून द्वितीय आला. संघर्ष रोहिदास डंबाळे हा 89.80 टक्के गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष किसनराव विधाते, सचिव विश्वास ठाकूर, मुख्याध्यापिका निर्मला शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

नवजीवन हायस्कूल
नवजीवन एज्युकेशन सोसायटीच्या शिवशक्ती चौकातील नवजीवन विद्यालयाचा निकाल 97.5 टक्के लागला असून साक्षी गायकवाड ही 94.80 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली. तर डिंपल चौधरी ही 93.40 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. जंगीद खुशी हा 93.20 टक्के गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त सुभाष देशमुख, समन्वयक महेंद्र विंचुरकर, मुख्याध्यापिका मंगल पवार यांनी अभिनंदन केले आहे.

सावित्रीबाई फुले विद्यालय
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालयाचा निकाल 90 टक्के लागला आहे. प्रिती विजयबहादूर विश्वकर्मा व अमोल वासुदेव गोंडगे हे 86.20 गुण मिळवून प्रथम आले. कोमल बाळासाहेब पगारे ही 84.60 टक्के गुण मिळवून द्वितीय आली तर श्रद्धा अंगद राऊत ही 80.40 टक्के गुण मिळवून तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक मधुकर बच्छाव व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

ग्रामोदय विद्यालय
जुन्या सिडकोतील ग्रामोदय विद्यालयाचा निकाल 89 टक्के लागला असून कोमल किरण रामराजे ही 94.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर विशाल संभाजी बोरसे हा 94 टक्के गुण मिळवून द्वितीय आला. अर्पिता अनिल पांगरे ही 92.40 टक्के गुण मळवून तृतीय आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे, सरचिटणीस कृष्णराव नेरे, मुख्याध्यापक माणिक भदाणे यांनी अभिनंदन केले.

शालिनीताई बोरसे विद्यालय
दौलतनगर येथील डॉ.शालिनीताई बोरसे माध्यमिक विद्यालयाचा निकाल 77.04 टक्के लागला असून पुजा रवींद्र वानगेकर ही 94 टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर सोनाली चंद्रकांत पाटील ही 90 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. भूषण श्रावण पालवे हा 88 टक्के गुण मिळवून तृतीय आला. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एस.एस.भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले.

माध्यमिक विद्यालय, सिडको वसाहत
अंबिका शिक्षण मंडळाच्या माध्यमिक विद्यालय, सिडको वसाहत या शाळेचा निकाल 66 टक्के लागला असून लोकेश बापू चव्हाण हा 87.60 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला. तर वैष्णवी राजेश बनकर ही 83.70 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. पवन प्रकाश हाळणे हा 78 टक्के गुण मिळवून तृतीय आला. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सचिव अमोल पाटील, मुख्याध्यापक आर.एम.पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

सरस्वती पाटील विद्यालय
पाटीलनगर येथील कालिका एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती सरस्वती गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 94.54 टक्के लागला असून मनीषा कैलास पुंजारे ही 96.60 टक्के गुण मिळवून प्रथम आली. तर जागृती निकुंभ ही 91.60 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. श्वेता वर्मा ही 91.40 टक्के गुण मिळवून तृतीय आली. गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, सचिव दत्ता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

टी.जे.चव्हाण विद्यालय
मोरवाडी येथील टी.जे.चव्हाण विद्यालयाचा निकाल 91.17 टक्के लागला असून सुशांत शेलार हा 94.60 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आला. तर ऐश्वर्या किशोर कामे ही92.80 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. मुख्याध्यापिका उज्ज्वला माळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

व्यंकटराव हिरे विद्यालय
सावतानगर येथील व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.85 टक्के लागला आहे. स्वयंम सुरेश बूब हा 96 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. तर शुभम्‌ भाऊसाहेब सोनवणे हा 95.20 टक्के गुण मिळवून द्वितीय आला तर वैष्णवी शांताराम पाटील ही 95 टक्के गुण मिळवून तृतीय आली. या शाळेचा गणित विषयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्व हिरे, मुख्याध्यापक डी.एन.नवले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

मनपा माध्य.विद्यालय, अंबड
महापालिकेच्या अंबड येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 62.87 टक्के लागला आहे. विकास मोरे हा 92.80 टक्के गुण मिळवून प्रथम आला. मुख्याध्यापक अरुण दातीर व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सेंट लॉरेन्सची 100 ट्क्के निकालाची परंपरा कायम
सेंट लॉरेन्स हायस्कूलचा 10वीचा निकाल 100 टक्के लागला असून गेल्या 12 वर्षांपासूनची निकालाची परंपरा शाळेने कायम राखली आहे. प्रथमेश आंबरे हा 97.60 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आला. तर महेविश मिर्झा ही 96.80 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. वैभव गांगुर्डे व अलिशा अन्सारी 96 टक्के गुण मिळवून तृतीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक, मुख्याध्याक व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: The result of the CIDCO Ambad area is more than 90 percent