बागलाण तालुक्याचा दहावीचा निकाल ८५.१७ टक्के 

रोशन खैरनार 
शनिवार, 9 जून 2018

सटाणा - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा बागलाण तालुक्याचा निकाल ८५.१७ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 

सटाणा - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा बागलाण तालुक्याचा निकाल ८५.१७ टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. 

तालुक्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी ८९.१८ तर मुलांची टक्केवारी ८१.९५ इतकी आहे. तालुक्यातील बागलाण एज्यूकेश सोसायटी संचलित इंग्लिश मिडीअम स्कूल सटाणा, ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सटाणा येथील प्रगती माध्यमिक विद्यालय, दोधेश्वर पब्लिक स्कूल, किलबिल इंग्लिश मिडीअम स्कूल, बागलाण उर्दू हायस्कूल, नवे निरपूर येथील जनता विद्यालय, करंजाड येथील सिद्धी इंग्लिश मिडीअम स्कूल, तिळवण येथील तिलकेश्वर इंग्लिश स्कूल, किकवारी बुद्रुक येथील माध्यमिक विद्यालय, वाघंबा येथील यादवराव फुलाजी ठाकरे माध्यमिक विद्यालय, ढोलबारे येथील (कै.) राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय या शाळांसह जाड येथील (कै.) लोकनेते पंडित धर्मा पाटील माध्यमिक आश्रमशाळा, तताणी, दहिंदुले, हरणबारी, भिलवाड येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा तसेच नवे रातीर येथील आदर्श माध्यमिक विद्यालय, डांगसौंदाणे येथील छत्रपती शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, बाभूळणे येथील डी.वाय.ठाकरे माध्यमिक आश्रमशाळा या शासकीय आश्रमशाळांचा निकाल सर्वाधिक १०० टक्के लागला. श्रीपुरवडे येथील मातोश्री शांताबाई माध्यमिक विद्यालयातील परीक्षेस प्रविष्ठ झालेले सर्व विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने या शाळेचा निकाल तालुक्यात सर्वात कमी शून्य टक्के लागला आहे. तर धांद्री येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल १६.६६ टक्के व तळवाडे भामेर येथील शासकीय आश्रमशाळेचा निकाल ३३.३३ टक्के लागला आहे. बागलाण एज्यूकेश सोसायटी संचलित इंग्लिश मिडीअम स्कूलने गेल्या २० वर्षांची १०० टक्के निकालाची ऐतिहासिक परंपरा यंदाही टिकवून ठेवली आहे. तालुक्यातील ३१ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. गेल्या वर्षीच्या निकालात यंदा वाढ झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. 

काल दुपारी एक वाजता इंटरनेटद्वारे परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल जाहीर झाला. निकाल बघण्यासाठी शहरातील सायबर कफेवर विद्यार्थी व पालकांनी गर्दी केली होती. तर बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईल इंटरनेटवर निकाल बघितला. मात्र ठीक दुपारी एक वाजता सर्व्हर डाऊन झाल्याने हिरमोड झाला. काही वेळानंतर इंटरनेट सेवा सुरळीत होताच सर्वांनी निकाल बघितले. 

तालुक्यातील शाळा व त्यांचा निकाल पुढीलप्रमाणे : लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूल, सटाणा (९४.२६), जिजामाता गर्ल्स हायस्कूल, सटाणा (९६.२१), व्ही.पी.एन.विद्यालय, सटाणा (७८.१५), बागलाण एज्यूकेश सोसायटी संचलित इंग्लिश मिडीअम स्कूल, सटाणा (१००), बागलाण उर्दू हायस्कूल, सटाणा (१००), नामपूर इंग्लिश स्कूल, नामपूर (७५.१७), (कै.) सौ. आर. एम. अलई विद्यालय, नामपूर (५०), पंडित धर्मा विद्यालय, लखमापूर (७३.८५), कपालेश्वर माध्यमिक आश्रमशाळा (९७.९५), न्यू इंग्लिश स्कूल, ताहाराबाद (८९.४७), नूतन इंग्लिश स्कूल, निताने (६८.४२), जनता विद्यालय, मुल्हेर (९१.८३), जनता विद्यालय, मुंजवाड (९२), जनता विद्यालय, कंधाणे (८९.३६), कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, आसखेडा (९३.२७), नूतन विद्यालय, अंबासन (७६.८२), कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, आराई (६९.६४), जनता विद्यालय, अजमीर सौंदाणे (८८.६३), जनता विद्यालय, अंतापूर (८७.०३), नूतन इंग्लिश स्कूल, ब्राह्मणगाव (६६.४४), जनता विद्यालय, द्याने (६८.१८), जनता विद्यालय, जायखेडा (७४.४०), जनता विद्यालय, जोरण (९३.४७), जनता विद्यालय, वायगाव धुंदे (८९.८७), रामगिरबाबा विद्यालय, चौंधाणे (८०), जनता विद्यालय, डांगसौंदाणे (९३.१८), जनता विद्यालय, करंजाड (८४.४४), इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय, खिरमाणी (६५.९५), जनता विद्यालय, पिंपळकोठे (८२.५०), नेहरू विद्यालय, सोमपूर (५८.३३), जनता विद्यालय, टेंभे (५०), जनता विद्यालय, उत्राणे (७२.७२), कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय, वीरगाव (८०.४१), न्यू इंग्लिश स्कूल, आखतवाडे (८१.८१), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दोधेश्वर कोळीपाडा (५६.६६), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, साल्हेर (९२.५९), माध्यमिक विद्यालय, तळवाडे दिगर (९२.३९), तिलकेश्वर इंग्लिश स्कूल, तिळवण (१००), श्री शरदरावजी पवार विद्यालय, चौगाव (९७.६१), (कै.) पं.ध.पाटील माध्यमिक आश्रमशाळा, जाड (१००), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, पिंगळवाडे (८६.२७), सावित्रीबाई फुले विद्यालय, वटार (९७.२९), मातोश्री शांताबाई माध्यमिक विद्यालय, श्रीपुरवडे (०), शासकीय आश्रमशाळा, तताणी (१००), जनता विद्यालय, सारदे (७०.५८), न्यू इंग्लिश स्कूल, केरसाने (८६.२०), गोमुखेश्वर माध्यमिक विद्यालय, भिलवाड (९४.११), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, भिलवाड (१००), एम.डी. चौधरी माध्यमिक विद्यालय, चिराई (५०), आदर्श माध्यमिक विद्यालय, नवे रातीर (१००), जनता विद्यालय, मुळाणे (९०), कल्पना विद्या प्रसारक माध्यमिक विद्यालय, देवळाणे (९३.०२), टी.जे.पवार माध्यमिक विद्यालय, गोराणे (७५), तरुण मित्र मंडळ माध्यमिक विद्यालय, नांदीन (६८.५७), आर.बी.पाटील माध्यमिक विद्यालय, शेमळी (९८.२४), यादवराव फुलाजी ठाकरे माध्यमिक विद्यालय, वाघंबा (१००), माध्यमिक विद्यालय, ठेंगोडा (६३.१५), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, दहिंदुले (१००), माध्यमिक आश्रमशाळा, मोहोळांगी (९४.११), जनता विद्यालय, नवे निरपूर (१००), गणपत नामदेव ठाकरे माध्यमिक विद्यालय, पठावे दिगर (९४.४४), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, मानूर (९७.८२), माध्यमिक आश्रमशाळा, धांद्रीपाडा यशवंतनगर (४८.२७), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, तळवाडे भामेर (३३.३३), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, हरणबारी (१००), जनता विद्यालय, कोटबेल (७०), जनता विद्यालय, औंदाणे (९४.११), श्री भीमाशंकर माध्यमिक विद्यालय, श्रीपुरवडे (६७.८५), छत्रपती माध्यमिक आश्रमशाळा,डांगसौंदाणे (१००), डी. वाय. ठाकरे माध्यमिक आश्रमशाळा, बाभूळणे (१००), मातोश्री नवसाई अनुसूचित माध्यमिक आश्रमशाळा, लाडूद (८०.४८), श्री गजानन महाराज माध्यमिक विद्यालय, जाखोड (९०.९०), लालजी पाटील विद्यालय, सटाणा (९१.१७), सिद्धी इंग्लिश मिडीअम स्कूल, करंजाड (१००), जनता विद्यालय, दरेगाव (८७.५०), जनता विद्यालय, बिजोरसे (८२.३५), दोधेश्वर पब्लिक स्कूल, सटाणा (१००), किलबिल इंग्लिश मिडीअम स्कूल, सटाणा (१००), माध्यमिक विद्यालय, धांद्री (१६.६६), (कै.) राजाराम पाटील माध्यमिक विद्यालय, ढोलबारे (१००), ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, ताहाराबाद (१००), प्रगती माध्यमिक विद्यालय, सटाणा (१००), माध्यमिक विद्यालय, किकवारी बुद्रुक (१००).

Web Title: The result of Class 10 results in Baglan taluka is 85.17 percent