Dhule News : ऑटोरिक्षा मीटर्सचे पुनर्प्रमाणीकरण करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto News

Dhule News : ऑटोरिक्षा मीटर्सचे पुनर्प्रमाणीकरण करा

धुळे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, धुळे यांच्या परिचलन पद्धतीने झालेल्या बैठकीत नवीन भाडेदर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑटोरिक्षांच्या इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पूनर्प्रमाणीकरण (Re-calibration) दोन महिन्यांच्या आत करणे अनिवार्य आहे.

त्यामुळे ऑटोरिक्षा मालक, चालकांनी मुदतीत मीटरचे पुनर्प्रमाणीकरण करून घ्यावे, कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे. (Revalidate auto rickshaw meter dhule news)

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Pune News : पुण्यात शासकीय कार्यालयात चोरी, 12 वर्षांची महत्वाची कागदपत्रे घेऊन चोर झाला फरार

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत खटुआ समितीच्या अहवालानुसार ऑटोरिक्षा भाडेदर सूत्र विहित करण्याकरिता केलेल्या शिफारशीनुसार ऑटोरिक्षासाठी पहिल्या दीड किलोमीटर अंतरासाठी किमान देय भाडे २१ रुपयांवरून २७ रुपये असे निश्चित करण्यात आले आहे. पुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी किमान देय भाडे १४ रुपयांवरून १८ रुपये असे निश्चित करण्यात आले आहे.

नवीन भाडेदर निश्चित केल्याने ऑटोरिक्षांचे इलेक्ट्रॉनिक मीटर्सचे पुनर्प्रमाणीकरण (Re-calibration) दोन महिन्यांच्या आत अर्थात ३१ मे २०२३ पूर्वी करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत मीटर पुनर्प्रमाणीकरण न करणाऱ्या ऑटोरिक्षा परवानाधारकांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ अन्वये असलेल्या अधिकारात मीटर पुनर्प्रमाणीकरणाची विहित मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी किमान एक दिवस, तर कमाल सात दिवस परवाना निलंबित करण्यात येईल.

कमाल परवाना निलंबन कालावधी ४० दिवसांचा असेल. तसेच परवाना निलंबनाऐवजी तडजोड शुल्क भरावयाचे असल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये व किमान ५०० रुपये तथापि कमाल तडजोड शुल्क दोन हजारांपेक्षा अधिक असणार नाही. सर्व ऑटोरिक्षा मालक/चालक यांनी नोंद घेऊन विहित मुदतीत भाडेवाढीनुसार मीटरचे पुनर्प्रमाणीकरण करून घ्यावे व वाहनावरील कारवाई टाळावी, असे आवाहन श्री. कदम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा: Nashik News: वारी हीच आम्हासाठी दसरा अन्‌ दिवाळी : भास्कर पवारांच्या फेटेधारी दिंडीने वेधले लक्ष