Dhule News : धुळे जिल्ह्यात नदी-नाले अद्यापही कोरडेच

A dry embankment due to lack of sufficient rainfall.
A dry embankment due to lack of sufficient rainfall. esakal

Dhule News : पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटूनही महिनाभर उशिरा पावसाचे आगमन झाले. आता कुठे पेरण्या आटोपल्या आहेत. धूळपेरणी झालेल्या पेरण्या दुबार कराव्या लागल्यात.

पेरणीयोग्य पाऊस झालेला असला तरी नदी नाले खळखळ वाहतील, अशा पावसाची अपेक्षा आहे. लहानलहान बंधारेही अद्याप ओसांडलेले नाहीत. नाल्यांवरील लहान बंधाऱ्यांमध्येही डबकेच साचलेले आहे. (Rivers and streams in Dhule district are still dry news)

मार्च, एप्रिल आणि मेमध्ये अवकाळी पावसाने तडका दिला. पावसाळ्यात पाऊस लांबला. आषाढी एकादशीला पावसाचे आगमन झाले. तेही जिल्ह्यात कमी अधिक प्रमाण होते. तब्बल महिना सव्वा महिना पेरण्या उशिराने पूर्ण झाल्या आहेत.

सात वर्षांनंतर प्रथमच आषाढी एकादशीनंतर पेरण्यांना प्रारंभ झाला आहे. पावसाचे प्रमाणही विषमच आहे. बऱ्याच भागात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही.

जूनमध्ये पावसा अभावी पेरण्या लांबल्यात. मृग नक्षत्राच्या उत्तरार्धात पाऊस येईल, या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी धूळपेरण्या केल्यात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A dry embankment due to lack of sufficient rainfall.
Talathi Bharti 2023 : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात तलाठी भरतीसाठी 259 जागा; या संकेतस्थळावर करा अर्ज

प्रत्यक्षात पावसाचे मृग नक्षत्र संपल्यानंतर आगमन झाले. ते पाहिजे त्या पुरशा प्रमाणात नसल्याने धूळपेरण्यांना फटका बसला अन् दुबार पेरण्या कराव्या लागल्या. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागला.

जिल्ह्यातील चारही तालुक्यांत पुरेसा पाऊस झालेला नाही. भिजपाऊस होत आहे. आठ दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मात्र पाऊस कोसळलेला नाही. नदी-नाले कोरडेच आहेत. आता शेतकऱ्यांयांमधून सातत्यपूर्ण पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.

A dry embankment due to lack of sufficient rainfall.
Dhule News : धुळे शहरातील काही भागात या 2 दिवस पाणीपुरवठा होणार उशिरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com