Latest Marathi News | पुण्यातील रेखाचित्रकारासह मित्रांना लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Dhule Crime News : पुण्यातील रेखाचित्रकारासह मित्रांना लुटले

धुळे : पुणे येथील रेखाचित्रकारासह मित्रांना मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी (ता. धुळे) शिवारात लुटल्याची घटना घडली. लुटारूंनी कारवर दगडफेक करत चित्रकारासह दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील १५ हजार रुपये रोकडसह एकूण २५ हजारांचा मुद्देमाल लुटून नेला.

रेखाचित्रकाराला इंदूर येथील कार्यक्रमात मिळालेले गोल्ड मेडल असलेली बॅगही लुटारूंनी नेली. रविवारी (ता.२५) पहाटे अडीच ते तीनदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात सहा जणांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik News : स्थलांतरानंतरही ‘अडचणीचे’ शुक्लकाष्ठ कायम!

डॉ. राकेश अमरनाथ कदम (वय- ४५ रा. अप्पा चौक, वाघोली, आव्हाडवाडी, नगररोड, पुणे) यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ते रविवारी (ता.२५) पहाटे आर्वी गावापुढील बालाजी भारत पेट्रोलपंपाच्या बाजूला त्यांचा मित्र प्रशांत विजय कुलकर्णी (वय- ४५ रा. धनकवाड, पुणे) व नंदकिशोर आटपाळकर (वय- ५० रा. नरे आंबेगाव, पुणे) यांच्यासह कार (एमएच- १२ क्युएम- ८०१७) मध्ये झोपलेले होते.

त्यावेळी अचानक अज्ञात लोकांनी दगडफेक करत कारमधील डॉ. कदम व त्यांच्या मित्राला मारहाण केली. चाकू दाखवून १५ हजार रुपये रोख व इंदूर येथे गोल्ड मेडल मिळालेली बॅग तसेच, १० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल तसेच क्रेडीट कार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, दैनंदिन वापराचे कपडे व इतर साहित्य असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक सागर काळे तपास करत आहेत.

हेही वाचा: Nashik News : शहरात 2 महिलांच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल