राज्य महामार्गावरील वस्त्या दरोडेखोरांचे "लक्ष्य' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या "टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली असून, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांसह परप्रांतातून येणाऱ्या दरोडेखोरांनी याच वस्त्या लक्ष्य केल्या आहेत. तर दुसरीकडे, सिंधी कॉलनीतील दरोड्यात पोलिसांनी धरपकड सुरू केली असून विक्रेते, परप्रांतीयांच्या चौकशीवर पोलिसांच्या तपासाची मदार आहे. 

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील नागरी वस्त्या कॉलन्यांसह मोठे बंगले दरोडेखोरांच्या "टार्गेट'वर आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्य महामार्गावर झालेल्या घटना बघता परिसरातील रहिवाशांनी विशेष खबरदारी घेण्याची आवश्‍यकता आहे. नशिराबादपासून पाळधीपर्यंत नागरी वस्त्या आणि महामार्गाला कॉलन्यांची संख्या वाढली असून, घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांसह परप्रांतातून येणाऱ्या दरोडेखोरांनी याच वस्त्या लक्ष्य केल्या आहेत. तर दुसरीकडे, सिंधी कॉलनीतील दरोड्यात पोलिसांनी धरपकड सुरू केली असून विक्रेते, परप्रांतीयांच्या चौकशीवर पोलिसांच्या तपासाची मदार आहे. 

एकाच दिवसात 3 अपार्टमेंटमधील 5 फ्लॅट फोडून काहीच न मिळाल्याने संतापलेल्या दरोडेखोरांनी थेट राहत्या घराचे दार तोडून रितेश कटारिया यांच्या घरातून शस्त्रांच्या जोरावर जबरी लूट केल्याची घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. कडाक्‍याच्या थंडीला सुरवात झाल्याने आता शहरात आणि जिल्ह्यात चोऱ्या घरफोड्यांचे सत्र आता सुरू झाले असून, बंद घरफोडीसह रस्तालूट, चोऱ्या जबरी लुटेच गुन्हे सर्रास घडू लागले आहेत. 

चोरी-घरफोड्यांच्या गुन्ह्यात वाढ होत असताना नागरिकांची निष्काळजी आणि सुरक्षिततेचे पुरेसे उपाय करण्यात येत नसल्याने दरोडेखोरांचा चालून संधी येऊ लागली आहे. विशेष म्हणजे महामार्ग आणि मुख्य रस्त्यावर असलेल्या कॉलन्या, अपार्टमेंट, बंगलेच या चोरट्यांचे लक्ष असून तास-अर्ध्या तासात काम करून सुसाट वेगात महामार्गाने पळ काढण्यास सोपे असल्याने महामार्गाला लागून असलेल्या कॉलन्याच दरोड्यासाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. 

तोकड्या उपाययोजना 
रितेश कटारिया राहत असलेल्या फ्लॅटच्या मुख्य दाराचा कडी-कोयंडा अगदी दोन स्क्रूंवर होता. या अपार्टमेंटच्या सर्व दहा फ्लॅटची अवस्था तीच आहे. बिल्डरकडून बांधलेल्या या फ्लॅट आणि इतरही शहरातील ड्युप्लेक्‍स बंगलोमध्ये अगदी तकलादू प्लायवूडचे तयार दारे लावण्यात आली असून, सिमेंटच्या फ्रेममध्ये जोडणी करून पन्नास लाखांच्या फ्लॅटची सुरक्षा दोन स्क्रुंवर असल्याचे आढळून आले आहे. घराच्या सुरक्षेसाठी किमान चांगल्या दर्जाचे सुरक्षाद्वार असायला हवे, कुलूप लावताना अगदीच शंभर दोनशे रुपयांच्या कुलपावर घराची सुरक्षा सोपणेही चुकीचे ठरते. 

कुत्रे व सीसीटीव्हीचे वैर 
घरात गल्लीत आणि अपार्टमेंटच्या तळमजल्यावर मोकाट कुत्रे घाण करतात म्हणून कुत्र्यांनाही येऊ दिले जात नाही. बिल्डिंगमध्ये एखाद्या कडेच कुत्रा असला तर तो, रात्री घरातच असतो. सोसायटीत इतर सदस्य पैसे देत नसल्याने बहुतांश अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक, वॉचमन ठेवण्यात येत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पोलिसांकडून वारंवार सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना दिल्यानंतरही कुठल्याच अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याचे उदाहरण नाही. 

गुन्ह्यांतील सातत्य 
- शहरात युनिटी चेंबरमधील सद्‌गुरू कृपा मोबाईल्स हे दुकान (क्रमांक 32) फोडल्याची घटना 10 डिसेंबरला घडली. 
- सैन्यदलातील जवान समाधान चित्ते यांच्या राष्ट्रीय महामार्गालगत द्वारकानगरात बंद घर फोडून दागिन्यांसह लाखावर ऐवज लांबवल्याची घटना 10 डिसेंबरला घडली. 
- मोहाडी रोडवर मुख्य रस्त्यालाच दौलतनगरात डॉ. सुरेश चौधरी यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना 9 डिसेंबरला उघडकीस आली. 
- ममुराबाद रोडवर शिखवालानगरात सचिन देवचंद सोनवणे यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोने, चांदीच्या दागिन्यांसह 62 हजारांचा ऐवज लांबवला. 
- रिंगरोडवर महिला डॉक्‍टरच्या गळ्यावर सुरा ठेवून पाच लाखांची रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना 29 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्री घडली होती. तत्पूर्वी 15 दिवसांपूर्वीच क्रीडा संकुलसमोरील डॉ. दोशी यांच्या घरात दरोडा पडला होता. या दोघा गुन्ह्यात घरातील नोकरांचा सहभाग आढळून आला होता. 

Web Title: Robbers target wadi on State Highway