अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतच रोहिणी नदी कामाचा शुभारंभ

प्रा. भगवान जगदाळे
गुरुवार, 19 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे): माळमाथा परिसरातील निजामपूर-जैताणे येथील ग्रामस्थांच्या लोकसहभागातून व श्रमदानातून संभाजीनगर (औरंगाबाद) येथील महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानच्या सहकार्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात भूजल पातळी वाढविण्यासाठी रोहिणी नदी पात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामाचे अखेर बुधवारी (ता. १८) अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर, परंतु अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतच उदघाटन झाले..

सुरुवातीस प्रांताधिकारी गणेश मिसाळ व तहसीलदार संदीप भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचे उदघाटन करण्याचा जलसमितीचा मानस होता. परंतु, काही अपरिहार्य कारणास्तव ते शक्य न झाल्याने अखेर आज महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान, धुळे जिल्हा जलसमिती व निजामपूर-जैताणे ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सर्वजातीय, सर्वधर्मीय व सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स & मेडिकल असोसिएशन व दोन्ही गावांच्या मोजक्या ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थितीत रोहिणी नदी पात्रात श्रीफळ वाढवून या कामाचे उदघाटन झाले, अशी माहिती शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: rohini river work start in the absence of officers