रोटरी गोल्डची सामाजिक बांधीलकी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

रोटरी गोल्डसीटीचे सदस्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि डॉक्‍टरांच्या टिमची आज भेट घेतली. रुग्णालयात गंभीर स्थीतीत दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्‍यक व्हेन्टीलेटर्स बाबत विचारणा करुन दोन अतिरिक्त वेन्टीलेटर्स, ओटू नेझल मास्क, पीपीई किट्‌स, पोर्टेबल नेब्युलाझर आणि इतर साहित्य आपत्कालीन परिस्थिती जास्तीचे उपलब्ध असणे गरजेचे असल्याल्याने  तत्काळ रोटरी गोल्डच्या सदस्यांनी औरंगाबाद, इंदौर आणि इतरत्र साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला

जळगाव:- जिल्ह्याच्या पंधरा तालूक्‍यांचा भार असलेल्या जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल संशयित कोरोना बाधीत रुग्ण आणि उपलब्ध साधन सामग्रीचा आढावा घेत रोटरी गोल्ड सीटीचे सदस्य मदतीला धावून आले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेऊन अत्यावश्‍यक सेवेसाठी कमतरता असलेल्या वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी या सदस्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना संशीयतांसाठी स्वतंत्रकक्षाची स्थापना करण्यात आली असून परदेशातून आलेले व बाधीतांच्या संपर्कात येणाऱ्यांना 14 दिवस कॉरेन्टाईन करण्यात येत असून दाखल होणारे रुग्ण आणि रुग्णायात अत्यावश्‍यक वैद्यकीय बाबींची आज रोटरी गोल्डसीटीचे सदस्य नंदु अडवाणी, सतीश मंडोरा, चंदर तेजवानी, प्रशांत कोठारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि डॉक्‍टरांच्या टिमची आज भेट घेतली. रुग्णालयात गंभीर स्थीतीत दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी आवश्‍यक असलेल्या व्हेन्टीलेटर्स बाबत विचारणा करुन दोन अतिरिक्त वेन्टीलेटर्सची मागणी करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात त्यांचे 6 अगोदरच उपलब्ध आहेत, ओटू नेझल मास्क, पीपीई किट्‌स, पोर्टेबल नेब्युलाझर आणि इतर साहित्य आपत्कालीन परिस्थिती जास्तीचे उपलब्ध असणे गरजेचे असल्याल्याने त्यांची मागणी डॉ. बिराजदार यांच्याकडून करण्यात आली. तत्काळ रोटरी गोल्डच्या सदस्यांनी औरंगाबाद, इंदौर आणि इतरत्र साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी संपर्क साधला असून लवकरात लवकर या रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचे आश्‍वासनही देण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rotatry gold city help on corona dises in jalgaon civil