पालखेडचे पाणी आले तरच फुलणार रब्बी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध पाण्यावर कांदे काढण्याला शेतकऱ्यांचे प्राध्यान्य आहे.

येवला - खरिपालाच पाणी नव्हते,आज तर प्यायलाही पाण्याचा वानवा आहे..अशा स्थितीत रब्बी निघेल का हा प्रश्न हास्यास्पद ठरावा अशी स्थिती तालुक्यात आहे.मात्र पालखेड डाव्या कालव्याला महिनाभराचे एक आवर्तन मिळणार असल्याने या पाण्यावर लाभक्षेत्रातील ४२ गावात रब्बीचा काहीसा आशावाद जागा झाला आहे.त्यातही उपलब्ध पाण्यावर कांदे काढण्याला शेतकऱ्यांचे प्राध्यान्य आहे.

खरीप हंगामातील पिके पावसाअभावी पूर्ण वाया गेला आहे.जून, जुलैमध्ये रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.परंतु पुन्हा पाऊस पडला नाही. त्यामुळे हातातोंडला आलेली पिके वाया गेली. पिके जागेवर करपल्याने खरीप वाया गेला आहे. खरीपात शेतीला लावलेले भांडवलही मका,कांदे,सोयाबीन,कपाशीची झालेली वाताहात पाहता मिळत नाही.यामुळे चिंताग्रस्त शेतकरी वरुणराजाने अवकाळी चमत्कार करून पाऊस पाडून रब्बी फुलवावा अशी वाट पाहून आहेत.

टंचाईमुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या नादी न लागता लाल खांद्यात अधिक क्षेत्र गुंतवले असून काहींनी उन्हाळ कांद्याचे नियोजन केले आहे.तर पालखेडच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी महिन्याच्या आवर्तनाच्या भरोशावर कांदे व काही प्रमाणात गहू आणि मोठ्या प्रमाणात हरभरा,ज्वारीचे नियोजन केल्याचे दिसते.येणाऱ्या सिंचनाच्या आवर्तनातून शेततळे भरून ठेवून रब्बीची पिके कशीबशी काढण्याचेही मनसुभे शेतकऱ्यांचे आहेत.तालुक्याचे खरिपाचे क्षेत्र ५३ हजार हेक्टर असताना ६८ हजारावर क्षेत्रात पेरणी झाली होती.मात्र रब्बीचे क्षेत्र १३ हजार ४८६ हेक्टर असतांना तीन हजारांपर्यत पेरणी होते कि नाही याविषयी शाशकता आहे.

कायमस्वरूपी असलेला हा दुष्काळी तालुका रब्बीमुक्त होतो कि काय याची भीती वाटत आहेत. तालुक्यातच्या शासकीय नोंदीत १२४ पैकी ५२ गावेच रब्बीची आहेत.तथापि,शंभरवर गावात रब्बीची पेरणी होते.पण पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ४२ गावात हंगाम निघण्याची शश्वती असते. मात्र आजचे या भागातले चित्र अजूनही गोत्यातच असल्याचे दिसतेय. 

असे आहे रब्बीचे क्षेत्र (हे.)
पीक  = येवल्यातील सरासरी क्षेत्र  = जिल्ह्याचे प्रस्तावित क्षेत्र
ज्वारी  = १३६०      = ४४२०
गहू    = ८०२३      = ७००००
मका   = २४      =  ३०००
हरभरा    = ४१०३     = ४१०००
कांदा  =  ११५२५  =     ---
बाजरी =    ००    = २००


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rubbi to blossom only when Palkhed water comes