खानदेशातून धावणार राजधानी एक्‍स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

जळगाव - खासदार रक्षा खडसे यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्‍स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे.

जळगाव - खासदार रक्षा खडसे यांनी आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. मुंबई ते नवी दिल्ली व्हाया भुसावळ अशी राजधानी एक्‍स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी या भेटीत केल्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दर्शवली आहे.

यासंदर्भात खासदार खडसे यांनी दिलेल्या निवेदनात या रेल्वेगाडीची तसेच या गाडीला भुसावळसह जळगाव, चाळीसगाव व नाशिक या थांब्याची गरज नमूद केली आहे. नाशिक हे ‘अ’ दर्जाचे स्थानक असून औद्योगिक क्षेत्र, धार्मिक, स्थान, आर्मी व एअर फोर्स चे बेस स्टेशन, शैक्षणिक सुविधा, द्राक्ष आणि कांदे या कृषी क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे. चाळीसगाव हे ‘अ’ दर्जाचे स्थानक असून जगप्रसिद्ध वेरूळच्या लेणी येथून फक्त ६० किमी अंतरावर आहेत. धुळे जिल्ह्याशी जोडले असून धुळेवासीयांना सुद्धा या गाडीच्या थांब्याचा लाभ मिळणार आहे. जळगाव स्थानक हेदेखील ‘अ’ दर्जाचे स्थानक असून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी फक्त ६० किमी अंतरावर आहेत. खानदेशातील व्यावसायिक, व्यापारी, मंत्री, खासदार, आमदार, पर्यटक, संरक्षण अधिकारी, विद्यार्थी यांना नेहमी दिल्ली येथे कामासाठी ये- जा करावी लागते. परंतु, राजधानी सारखी एकही प्रीमियम सुपरफास्ट गाडी या मार्गावर नसल्या कारणाने या सर्वांची गैरसोय होते.

गाडीला लवकरच ‘हिरवा कंदील’!
खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्येक रेल्वे बजेट मध्ये या राजधानी गाडीची मागणी केलेली होती. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेऊन एक एसी रेल्वेगाडी प्रायोगिक तत्त्वावर चालू केली होती. यादरम्यान राजधानी गाडीच्या वेगाची चाचणी घेण्यात आली. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हिरवा कंदील दाखवून ही राजधानी एक्‍स्प्रेस सुरू होणार आहे.

Web Title: Run Rajdhani Express from Khandesh