ग्रामीण भागात उभारणार ‘हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर’ - अश्‍विनीकुमार चौबे

अरुण मलाणी
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक - केंद्राच्या ‘आयुष्यमान भारत योजने’च्या पुढील टप्प्यात ग्रामीण भागातील गावांना एकत्र जोडत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ उभारली जातील. या वर्षाअखेरीपर्यंत १५ हजार वेलनेस सेंटर उभारणार असून त्यापैकी ११ हजार सेंटरचे काम पूर्णत्वास आले आहे. २०२२ पर्यंत दीड लाख सेंटर देशात कार्यरत असतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनीकुमार चौबे यांनी आज येथे यांनी दिली.

नाशिक दौऱ्यावर आले असताना चौबे यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. ते म्हणाले, की हेल्थ अँड वेलनेस सेंटरला टेलीमेडिसीनशी जोडले जाईल. हायपर टेंशन, रक्‍तदाबापासून कर्करोगापर्यंत विविध बारा आजारांवर या सेंटरमध्ये प्राथमिक तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी साठ लाख लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. ‘इग्नू’ आणि केंद्राच्या कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. दुर्गम भागातील देशवासीयांना तालुका, जिल्हा पातळीवर उपचारासाठी यावे लागत असल्याने त्यांचा रोजगार जायचा, प्रवासासोबत अन्य खर्च होतो. हे प्रश्‍न सेंटरमुळे मार्गी लागतील.

Web Title: Rural Area Health and Wellness Center ashwinikumar choubey