
जळगाव : सचिन आहेर बनला गावातील पहिला PSI
तोंडापूर (जि. जळगाव) : येथील गरीब कुटुंबातील तरुण सचिन दशरथ आहेर याने पहिल्याच प्रयत्नांत गावात पहिला पोलिस उपनिरीक्षक बनण्याचा बहुमान मिळवून गावाचा व स्वत:चा नावलौकिक मिळवला असल्याने तोंडापूर येथील शेतकरी उत्पादक गटाने त्याचा सत्कार केला.
तोंडापूरसह परिसरात पहिल्यांदा पोलिस उपनिरीक्षक (PSI) म्हणून तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण होऊन नुकत्याच महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेऊन मुंबई येथे नवनिर्वाचित उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झालेला तोंडापूर येथील सचिन आहेर याचा मित्र परिवार व शेतकरी उत्पादक कंपनीच्या तरुणांच्या वतीने विविध कार्यकारी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला.
या वेळी शुन्यातून विश्व निर्माण करणारा गरीब घरातील तोंडापूरचा सुपुत्र आज पोलिस उपनिरीक्षक बनला असल्याचा अभिमान आहे, असे सोसायटीचे सचिव भानुदास पाटील सत्कारप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना केले.
हेही वाचा: भाजप सरकारवर नामुष्की! PSI भरतीची परीक्षा रद्द करण्याची गृहमंत्र्यांची घोषणा
सचिन आहेर हा शेतकरी दशरथ आहेर यांचा मुलगा आहे. नोकरी अगोदर सचिन शेतात काम करत होता. शिक्षण करत असताना २००८ मध्ये पोलिस भरतीत औरंगाबादमध्ये भरती होऊन १४ वर्षे नोकरी करत असताना डिपार्टमेंट अंर्तगत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मेहनतीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नांत पास झाल्याने महाराष्ट्र पोलिस अकादमी प्रशिक्षण केंद्रात घेण्यात आले.नुकत्याच दोन दिवस अगोदर नाशिक (Nashik) येथे दीक्षांत सोहळ्यात सचिन आहिरे यांना मुंबई येथे पोलिस उपनिरिक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली.
हेही वाचा: प्रतिकुलतेवर मात करणारा 'दीपक' बनला फौजदार; पंचक्रोशीत गौरव
तोंडापूर गावात परिसरात पहिला पोलिस उपनिरिक्षकपदाचा बहुमान सचिन आहेर यांनी मिळवला. म्हणून सोसायटीचे सचिव भानुदास पाटील व तोंडापूर येथील शेतकरी (Farmer) उत्पादक कंपनीच्या तरूण मित्रमंडळाचे सदस्य संदीप काकडे, डॉ. दीपक पाटील, दत्तात्रय कानडे, प्रकाश कुंभार, पितांबर कुंभार, विठ्ठल राऊत, उमेश पाटील, दादाराव आहेर, गोकुळ वाघ, अर्जुन चौधरी, विठ्ठल दागोडे यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. तोंडापूर गावासह परिसरात पहिला पोलिस उपनिरीक्षक बनल्यामुळे माजी सरपंच कुंभारी बुद्रुक सुरतसिंग जोशी, हिरामण जोशी, लक्ष्मण जोशी, सतीश बिऱ्हाडे, जितेंद्र आगळे, नंदू मडाळे, सचिन सुरडकर व रामेश्वर सोनवणे, गणेश पाटील, शिवाजी पाटील यांनी अभिनंदन केले.
Web Title: Sachin Aher Became The First Psi From Tondapur Village In Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..