नियमांचे पालन करून वाहने चालवा सुरक्षित - आयुक्त सिंगल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नाशिक रोड - वाहने चालविताना सुरक्षा साधने वापरणे गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाचे स्वप्न जगविण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने सुरक्षित चालविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले. चांडक-बिटको महाविद्यालयात उम्मीद फाउंडेशन व पोलिस आयुक्तालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेटवाटप कार्यक्रमाप्रसंगी श्री. सिंगल बोलत होते.

प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. उपायुक्त दत्तात्रय कराळे, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, उपायुक्त अतुल झेंडे, जयंत बजबळे, अजित चव्हाण, विनायक मोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, संजय देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. संजय तुपे, प्रा. विजय सुकटे, सुधाकर बोरसे, लक्ष्मण शेंडगे, योगेश म्हस्के आदी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. डॉ. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. जयंत भाभे यांनी सूत्रसंचालन केले. सुमित बोथरा यांनी आभार मानले. उम्मीद फाउंडेशनचे तेहसीन खान, जनीन चाफळकर, एजाज हुसेन, तुषार भुतडा, सर्फराज सय्यद, भरत उभरानी यांनी
संयोजन केले.

Web Title: Safe driving by discipline