पथारेच्या सागरची ‘इस्रो’त गरुडझेप

विजयसिंह गिरासे
सोमवार, 29 जुलै 2019

भल्या-भल्या देशांना आश्‍चर्यचकित करत अंतराळ संशोधनात उंचच उंच भरारी घेणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात ‘इस्रो’मध्ये सेवेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. गरिबीचा बाऊ न करता, आई-वडिलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवत अशीच मेहनत घेत पथारे (ता. शिंदखेडा) येथील तरुणाने ‘इस्रो’त सेवेचे ध्येय गाठले आहे.

चिमठाणे - भल्या-भल्या देशांना आश्‍चर्यचकित करत अंतराळ संशोधनात उंचच उंच भरारी घेणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात ‘इस्रो’मध्ये सेवेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. गरिबीचा बाऊ न करता, आई-वडिलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवत अशीच मेहनत घेत पथारे (ता. शिंदखेडा) येथील तरुणाने ‘इस्रो’त सेवेचे ध्येय गाठले आहे. विशेष म्हणजे भारताचे ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावत असतानाच ‘इस्रो’मध्ये निवड झाल्याचा ‘ई-मेल’ त्याला प्राप्त झाल्याने त्याचीही ही गरुडझेप ठरली आहे.

सागर रणजितसिंह राजपूत (वय २५) असे या तरुणाचे नाव असून, त्याची गुजरातमधील अहमदाबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन केंद्रात अर्थात ‘इस्रो’त तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sagar Rajput in Isro Selection Success Motivation