पटावरच्या सोंगट्यांचा रंगला डाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

'सकाळ'तर्फे जिल्हा स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेला दिमाखात सुरवात
 

नाशिक : बौद्धिक कसोटी पाहतांना चौकसपणाने खेळतांना आपले जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपले कौशल्य पणाला लावले. 'सकाळ', जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावरील पार्कसाइड होम्स येथे आयोजित या स्पर्धेतील तिनही गटात स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या उद्‌घाटनाप्रसंगी आमदार सीमा हिरे, पार्कसाइडचे संचालक मर्झियान पटेल, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ मंडल प्रबंधक प्रदीप शेणॉय, विपणन प्रबंधक अभय कुलकर्णी, श्री.सुखात्मे, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष धनंजय बेळे, महेश हिरे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर स्पर्धेला सुरवात झाली. यात मानांकित तसेच हौशी बुद्धिबळपटूंनीदेखील सहभाग नोंदविला. बाद पद्धतीने ही स्पर्धा खेळली जात आहे.
 

Web Title: sakal chess competition at nashik