शिक्षकांनी लुटला चित्रकला स्पर्धेचा आनंद

श्रीकांत जोशी
सोमवार, 17 डिसेंबर 2018

भुसावळ - राज्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने आकर्षक फलक लेखन करून चित्रकला शिक्षकांनीही घेतला या स्पर्धेचा आनंद. आपली कला त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली तेव्हा त्यांचे अनेकांनी कौतुक केले.

देशातील सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी ओळख असलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने मुलांच्या कलेला व भावना व्यक्त करण्यास वाव मिळतो. गेल्या तीन पिढ्यांपासून ही स्पर्धा महाराष्ट्र व गोवा या राज्यात घेतली जाते. यंदा मुलांप्रमाणे या स्पर्धेचा आनंद चित्रकला शिक्षकही घेत असल्याचे दिसून आले. स्पर्धेसाठी राज्यातील अनेक केंद्रांवर शिक्षकांनी आकर्षक फलक लेखन केले होते व हे केलेले फलक लेखन त्यांनी कलाविष्कार व माझी शाळा माझा फळा या व्हॉट्‌सअप ग्रुपवर व्हायरल केले तर, काही शिक्षकांनी इतर सोशल मीडियावरही हे लेखन व्हायरल केले.

विशेषतः नाशिक, नगर, मनमाड, चांदवड या भागातील तसेच बागलाण, पारनेर या दुर्गम भागातील चित्रकला शिक्षकांची कलाकृतीचे अनेकांनी कौतुक केले. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतही अनेकांनी स्पर्धेची माहिती देणारे आकर्षक लेखन केले होते.

Web Title: Sakal Drawing Competition Bhusawal