शहादा पालिका सभापती खून;आरोपींना अटक करा तरच अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

शहादा येथे टॅंकर लावण्याच्या कारणावरून उसळलेल्या दंगलीतील जखमींची विचारपूस करण्यासाठी गेलेले पालिकेचे बांधकाम सभापती तथा एमआयएमचे नगरसेवक सद्दाम तेली यांच्यावर झालेल्या चाकूहल्लात त्यांचा मृत्यू झाला. या साऱ्या प्रकारणामुळे आज देखील तणावपुर्व वातावरण असून, आरोपींना अटकअटक करत नाही तोपर्यंत तेली यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटूंबीय व समर्थकांनी घेतला आहे. 

शहादा- शहादा येथे टॅंकर लावण्याच्या कारणावरून उसळलेल्या दंगलीतील जखमींची विचारपूस करण्यासाठी गेलेले पालिकेचे बांधकाम सभापती तथा एमआयएमचे नगरसेवक सद्दाम तेली यांच्यावर झालेल्या चाकूहल्लात त्यांचा मृत्यू झाला. या साऱ्या प्रकारणामुळे आज देखील तणावपुर्व वातावरण असून, आरोपींना अटकअटक करत नाही तोपर्यंत तेली यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय कुटूंबीय व समर्थकांनी घेतला आहे. 

शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात पाण्याचे टॅंकर लावण्यावरून बुधवारी (ता.14) वाद झाला होता. या वादाचे रूपांतर दंगलीत होवून दगडफेक, तोडफोड झाली होती. या साऱ्या प्रकणामध्ये दंगलीत जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी रूग्णालयात गेलेले नगरपालिकेचे बांधकाम सभापती सद्दाम तेली यांच्यावर चाकूहल्ला झाला. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेली यांच्या मृत्यूनंतर शहरातील वातावरण अधिक तणावपूर्ण होवून जाळपोळ, दगडफेक झाली होती. आज देखील सकाळपासून शहरात तणावपुर्ण वातावरण कायम असून, तेली यांच्यावर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भुमिका कुटूंबियांनी घेतली असून, मृतदेत घरातच ठेवण्यात आलेला आहे. 

Web Title: sakal news breaking news shahada news

टॅग्स