आयडीया महाविद्यालयात "व्हर्टिकल स्टुडिओ' सुरु 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

नाशिक ः विषय एकच असला तरी, त्याला विविध दृष्टीकोनातून पाहाता येते. त्यातून बारकावे समजावून घेत संपूर्ण विषयाचा उलगडा होत जातो. कुठल्याही निर्मितीची साधारण हीच प्रक्रिया आयडीया महाविद्यालयाचे विद्यार्थी अनुभवत आहेत. "व्हर्टिकल स्टुडिओ' या चार दिवसांच्या डिझाईन कार्यशाळेत विद्यार्थी "आयडीया ऑफ प्लेस' हा विषय अभ्यासत आहेत. त्या अंतर्गत कार्यशाळेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. 

बदलत्या काळात वास्तू निर्मितीमध्ये दृक्‌श्राव्य माध्यम अर्थात "फील्म'चा वापर कसा होतो, हे समजून घेतले आहे. पुढच्या टप्प्यात विद्यार्थी प्रत्यक्ष निर्मिती करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विद्यावर्धन ट्रस्टच्या इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट ऍण्ड आर्किटेक्‍चरतर्फे (आयडिया) विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा म्हणून दरवर्षी "व्हर्टिकल स्टुडिओ' उपक्रम राबवला जातो. अतुल पेठे (पुणे), अविजीत किशोर (मुंबई), अभिजीत सौमित्र (पुणे), रोहन शिवकुमार (मुंबई), सोनम पठाण (दिल्ली) यांच्या मार्गदर्शानाखाली कार्यशाळा सुरू आहे. कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे गट तयार करत तज्ज्ञ त्याचे नेतृत्व करत आहेत. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांच्या विविध विषयावरील "फील्म' अभ्यासल्या. 
कार्यशाळेत सायंकाळच्या सत्रात तज्ज्ञ आपल्या कामाचे सादरीकरण सादर करत आहेत. अभिजीत सौमित्र यांनी "ऐलीफ्ट ड्रीम्स' ही गणपती बाप्पावर आधारित "फील्म' दाखविली. सोनम पठाण यांनी ट्रीपल तलाखच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकणारी "अजा' ही "फील्म' सादर केली. 

रविवारी समारोप 
"व्हर्टिकल स्टुडिओ' या उपक्रमाचा समारोप रविवारी (ता. 8) दुपारी अडीच ते सायंकाळी चार या वेळेत चांदशी येथील आयडिया महाविद्यालयाच्या आवारात होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Education