स्वतंत्र भारत पक्ष विधानसभेच्या सहा मतदारसंघातील निवडणूक लढवणार 

Live Photo
Live Photo


नाशिक, ता. 17 ः स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेची बैठक आज नाशिकमध्ये झाली. त्यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात निफाड, इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर, सिन्नर, चांदवड-देवळा, नाशिक मध्य आणि नाशिक पश्‍चिम मतदारसंघाचा समावेश असेल. आर्थिक-व्यापार-तंत्रज्ञान स्वातंत्र्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटना हा पर्याय असल्याचा दावा करण्यात आला. बैठकीसाठी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष शंकर पूरकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जून बोराडे,भगवान बोराडे-पाटील, अनंत सादडे, गणेश गुंजाळ, रवींद्र तारडे, किरण काहांडळ, बाळकृष्ण नाठे, रामदास सहाणे, तानाजी झाडे, किरण गवारे आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com