स्वच्छता मोहिमेत अविघटित कचरा जमा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

नाशिक ः किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत गुरुवारी (ता. 29) नाशिकमध्ये प्लॅस्टिकविरहित दिवस पाळण्यात आला. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पांडवलेणी परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यातून संकलित झालेला अविघटित कचरा खत प्रकल्पाकडे जमा करण्यात आला. तसेच सावरकरनगर येथील विश्‍वास बॅंकेच्या परिसरात भरविण्यात आलेले छायाचित्र प्रदर्शन शुक्रवारी (ता. 30) सकाळी दहा ते सायंकाळपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. 

पांडवलेणी परिसर शहरातील पर्यटनस्थळ. हौशी पर्यटकांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. त्यात प्लॅस्टिक, थर्माकोलसारख्या अविघटित कचऱ्याचा समावेश असतो. मुळातच, हे स्थळ संरक्षित ठिकाण असून, हा कचरा इथल्या जैवविविधतेला हानिकारक असतो. वसुंधरा क्‍लब, किर्लोस्कर इंजिन ऑइल कंपनीचे कर्मचारी आणि आनंदनिकेतन शाळेतील विद्यार्थी या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी 70 किलो अविघटनशील कचरा जमा करून पायथ्याशी आणला. 
मोहिमेत सहभागी नाशिककरांशी वसुंधरा क्‍लबचे अमित टिल्लू आणि किर्लोस्करचे निखिल चामनीकर यांनी संवाद साधला. या मोहिमेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होईल, असा विश्‍वास वसुंधरा क्‍लबचे वीरेंद्र चित्राव यांनी व्यक्त केला. क्‍लबचे हेमंत बेळे, स्वप्नील राव आदी उपस्थित होते. 

हसतखेळत उपक्रम 
जिल्हा परिषदेच्या गाजरवाडी प्राथमिक शाळेत हसतखेळत पर्यावरण हा उपक्रम राबविण्यात आला. त्यात श्री. टिल्लू यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सापडणाऱ्या सापांच्या विविध प्रजाती, विषारी आणि बिनविषारी साप कसा ओळखावा याची माहिती दिली. त्याचसंबंधीचा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Environment