पूरग्रस्तांसाठी समता परिषद,मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे मदत

Live Photo
Live Photo

नाशिक ः अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि मुंबई व नाशिकच्या मेट भुजबळ नॉलेज सिटीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत संकलित करण्यात आली. जीवनावश्‍यक वस्तूंची मदत नांदगावचे आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते आज इस्लामपूर व वाळवा तालुक्‍याकडे रवाना करण्यात आली. 
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्‍यक वस्तूंचे संकलन करुन मदतीचे आवाहन समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले होते. त्यांची मिनरल वॉटर, बिस्कीट, अन्नपदार्थ, नवीन कपडे, चादरी, ब्लॅंकेट, तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य, औषधे व इतर जीवनावश्‍यक वस्तू आणि विद्यार्थ्यांसाठी वह्यांसह इतर शालेय साहित्याचे संकलनाची सूचना होती. नाशिक, धुळे, पालघर, मुंबई, नवी मुंबई जिल्ह्यातून मदत जमा करण्यात आली. सर्व सामग्रीचे पॅकेजिंग करण्यात आले. मदत रवाना करताना याप्रसंगी संस्थेचे विश्‍वस्त दिलीप खैरे, समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. कैलास कमोद, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषद शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, धनंजय भावसार यांच्यासह संस्थेचे सर्व इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापक आदी उपस्थित होते. 

मदतीचे साहित्य 
कांदे, बटाटे, गहू, तांदूळ प्रत्येकी पाच टन 
एक ट्रकभर पॅकिंग केलेले मिनरल वॉटर 
बिस्कीटांची पाच हजार पाकिटे 
विद्यार्थ्यांसाठी दहा हजार वह्या 
शालेय बॅग, चित्रकला वही, कंपास पेटी, कलर बॉक्‍स, पेन्सिल बॉक्‍स आदींचे दीड हजार कीट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com