त्रिगुणीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाचे पिंपळगाव बहुला 

आनंद बोरा ः सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक ः महापालिका क्षेत्रातील नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील पिंपळगाव बहुला गाव. तीन हजार लोकवस्तीच्या गावात त्रिगुणीनाथ महाराजांचा यात्रोत्सव रंगपंचमीला होतो. कुस्त्यांची दंगल होते. गेल्या दहा वर्षांपासून हरिनाम सप्ताह होतो. मारुती, भोलेनाथ, मरीआई, भवानीमाता मंदिर गावात आहे. भगिनींच्या दारुबंदीच्या आंदोलनामुळे चळवळीच्या नकाश्‍यावर पोचलेल्या या गावातील कन्या पोलिस दलात प्रवेशकर्त्या झाल्या आहेत. 

नाशिक ः महापालिका क्षेत्रातील नाशिक-त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील पिंपळगाव बहुला गाव. तीन हजार लोकवस्तीच्या गावात त्रिगुणीनाथ महाराजांचा यात्रोत्सव रंगपंचमीला होतो. कुस्त्यांची दंगल होते. गेल्या दहा वर्षांपासून हरिनाम सप्ताह होतो. मारुती, भोलेनाथ, मरीआई, भवानीमाता मंदिर गावात आहे. भगिनींच्या दारुबंदीच्या आंदोलनामुळे चळवळीच्या नकाश्‍यावर पोचलेल्या या गावातील कन्या पोलिस दलात प्रवेशकर्त्या झाल्या आहेत. 
शहरात असूनही गावपण जपलेल्या पिंपळगाव बहुलामध्ये पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा आहेत. महापालिका आणि ज्योती विद्यालयाचा त्यात समावेश होतो. गावाची जुनी तालीम आजही सुस्थितीत असून तरुण इथे कुस्त्यांचा सराव करतात. गावाने अनेक नामवंत मल्ल दिले आहेत. पूर्वी पहिलवानांचे गाव अशी ओळख होती. (कै) कारभारी नागरे, (कै) सुकदेव नागरे, (कै) पंढरीनाथ नागरे अशी मल्लांची नावे सांगता येतील. आता महादू नागरे, पंढरीनाथ काकड, भीमा धात्रक, शरद धात्रक हे कुस्त्यांचा फड गाजवतात. वैभव नागरे, सार्थक नागरे, बाला गाढवे यांचा राज्यस्तरीय कुस्त्यांमध्ये सहभाग असतो. 
गावात भजनी मंडळ असून कैलास घुगे, भीमा नागरे, धर्माजी नागरे, चंद्रकांत भालेराव, संजय गायकवाड आदींचा त्यात समावेश असतो. कैलास घुगे आणि भिमाजी नागरे दोन कीर्तनकार गावचे. पूर्वी गावात जहागीरदार वाडा होता. त्याची दुरावस्था झाली आहे. गावाजवळून नंदिनी नदी वाहते. राजेंद्र नागरे हे प्रादेशिक परिवहन अधिकारी झालेत. अनिता धात्रक, संध्या गुंबाडे व इतर तरुण पोलीस दलामध्ये आहेत. निवृत्ती काकड आणि भीमराव वावके हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. पूर्वी इथे वसंतराव नाईक येवून गेल्याचे स्थानिक रहिवाशी सांगतात. अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्या "प्रतिज्ञा' चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. गावात पूर्वी बोहाडा व्हायचा. भावले आडनावाच्या कुटुंबियांमुळे गावाची ओळख पिंपळगाव बहुला अशी झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. जलशुद्धीकरण केंद्रासाठी 111 एकर जागा देवूनही गावाला पाणी मिळत नसल्याने उन्हाळ्यात पाण्याच्या प्रश्‍नाला सामोरे जावे लागत असल्याची खंत स्थानिकांची आहे. 

पिंपळगाव बहुला शिवारात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. गावातील घरांची रचना आकर्षित करतात. वाडी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले गावाकडे वळतात. गावात बारव होती. ती आता बुजली आहे. 
- संजय भालेराव (स्थानिक रहिवाशी) 

आमच्या गावात कुस्तीपटू मोठ्याप्रमाणात आहे. तरुणाईला कुस्त्यांचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन उपलब्ध झाल्यावर राज्यासह देशासाठी चांगले मल्ल गावातून मिळतील.'' 
- विजय भावले (खेळाडू) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News Village