झोळीचा फास बसून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

निमगाव येथे मामाच्या गावी गेला असता घडलेली घटना 

निमगाव येथे मामाच्या गावी गेला असता घडलेली घटना 

नाशिक : निमगाव (ता. सिन्नर) येथे मामाच्या गावी गेलेला पंचवटीतील 12 वर्षीय मुलगा आज दुपारी झोळीच्या साडीचा फास बसून बळी गेला. अविनाश बाबु पवार (12, रा. फुलेनगर, गौंडवाडी, पंचवटी, नाशिक) असे दूर्दैवीरित्या मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. अविनाश हा त्याचे मामा गोविंदा कापसे (रा. निमगाव, ता. निमगाव) यांच्याकडे गेलेला होता. गुरुवारी (ता.7) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अविनाश मामाच्या घरात साडीने बांधलेल्या झोळीवर झोका खेळत होता. त्यावेळी अचानक त्याच्या गळ्याला झोळीच्या साडीचा फास बसला आणि त्यात तो बेशुद्ध पडला. त्यानंतर आज (ता.8) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याची आई संगीता पवार यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-12year-child-death-crimenews