भाजलेल्या विवाहितेचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नाशिक : मोखाडा येथे चूल पेटविताना डिझेलचा भडका झाल्याने भाजलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सुगंधा मोहन घाटाळ (26, रा. पवार पाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) असे विवाहितेचे नाव आहे. सुगंधा घाटाळ ही गेल्या गुरुवारी (ता.7) सकाळी अकरा वाजता राहत्या घरात चूल पेटवित होते. त्यावेळी डिझेल चुलीत टाकताच भडका उडाला आणि त्यात विवाहितेच्या साडीने पेट घेतला. यामध्ये विवाहिता 90 टक्के भाजल्याने त्यांना मोखाडा येथून प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज (ता.8) सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी मोखाडा पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik-burn-women-death-crimenews