गांधी सप्ताहात पिकअपसह सव्वा आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त 

live photo
live photo

नाशिक : महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने आयोजत सप्ताहात बेकायदा मद्याची वाहतूक करताना पिकअप वाहनाचा अवैध मद्यसाठा असा 8 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. 

गांधी सप्ताहात दसऱ्याला दादरा-नगर-हवेली येथे विक्रीस असलेला मद्यसाठा नाशिकच्या सीमावर्ती भागातून उत्तर महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार गेल्या मंगळवारी (ता.8) तीन पथकांच्या माध्यमातून अंबोली येथे नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत सीमा तपासणी नाका-आंबोली, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभाग आणि स्थिर सर्व्हेक्षण पथक सहभागी झाले होते. मात्र या मोहिमेची चाहूल लागताच परिसरात अवैध मद्यांच्या तस्करांनी वाहन सोडून पोबारा केला. सदरची बाब लक्षात येताच भरारी पथकांनी धाव घेत रस्त्यावर बेवारस उभ्या असलेल्या (एमएच 04 जीआर 193) या पिकअपची तपासणी केली असता, त्यात मद्याचा साठा मिळून आला. पिकअपमध्ये रॉयल चॅलेंज व्हिस्की, इंपेरियल ब्ल्यू, रॉयल स्पेशल, टूबर्ग स्ट्रॉंग बिअर असा पिकअप वाहनासह सुमारे 8 लाख 17 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 
याप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून निरीक्षक एस.डी. चोपडेकर हे तपास करीत आहेत. सदरची कारवाई निरीक्षक चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक पी.डी. झुंजकर, दुय्यम निरीक्षक आर.आर. धनवटे, एम.आर. तेलंगे तसेच विधान सभा स्थिर संरक्षण पथकाचे प्रमुख आर.एस. पाटील, व्ही.जी. संधन, सहाय्यक प्रमुख योगेश ठाकरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक पी.एम. जाधव, एच.एस. नेहरे, जवान आर.डी. पाटील, के.सी. कदम, जी.बी. परदेशी, व्ही.ए. चव्हाण, आर.वाय मुंढे यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com