पिंपळगाव बसवंत टोलनाक्‍यावर अवैध मद्यसाठा जप्त 

Residential photo
Residential photo

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्‍यावर अवैधरित्या वाहतूक केला जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने सदरची कारवाई करीत कारसह मद्यसाठा असा सुमारे पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात मतदारांना इच्छुक उमेदवारांकडून मद्याचे प्रलोभन दाखविले जाऊ शकते, ही शक्‍यता गृहीत धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य वाहतूक, विक्री व साठा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरु आहे. त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाला महामार्गावरील अवैधरित्या मद्याची वाहतूक होत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार दिंडोरी भरारी पथकाने महामार्गावरील पिंपळगाव बसंवत टोलनाक्‍यावर सापळा रचला होता. टोल नाक्‍यावर आलेल्या संशयित वॅगेनार कारची (एमएच 15 जीआर 7916) तपासणी केली असता, त्यात प्रथमदर्शन बनावट असलेल्या विदेशी मद्याच्या 137 बाटल्या आढळून आल्या. कार आणि मद्यसाठा असा 5 लाख 69 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अविनाश भामरे, राहुल गांगुर्डे (दोघे रा. पिंपळगाव बसवंत) या दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई दिंडोरी भरारी पथकाचे निरीक्षक एम. एन. कावळे, दुयम निरीक्षक एस. बी. शिंदे, जवान सोमनाथ भांगरे, विष्णु सानप, महेंद्र भोये, महेश खामकर, साक्षी महाजन यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com