ऑक्‍टोबर हिटचा नाशिककरांना तडाखा 

Residential photo
Residential photo

निवडणुकीचा ज्वरही शिगेला अन्‌ उन्हाचाही 


नाशिक : परतीच्या पावसाने विलंबाने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी, गेल्या दोन आठवड्यांपासून ऑक्‍टोबर हिटमुळे नाशिककरांना चांगलाच तडाखा दिला आहे. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने नाशिकचा कमाल पारा 31 अंश सेल्सियसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या कडक उन्हामुळे नाशिककरांना एप्रिल-मे-तील उन्हाची जाणीव होऊ लागली आहे. त्यातच रात्रीचा उकाडाही वाढला आहे. यातून सुटका होण्यासाठी नाशिककर थंडीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील रिंगणातील उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे वातावरण चांगलेच गरम झालेले असताना, त्यात "ऑक्‍टोबर हिट'चा तडाखा नाशिककरांना सहन करावा लागतो आहे. यंदा नाशिक शहर-जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. परतीच्या पावसानेही चांगलेच झोडपले. गोदावरी नदी एकदा नव्हे तर तीन-चारवेळा दुथडी भरून वाहिली. मात्र आता गेल्या दोन आठवड्यापासून नाशिकचा कमाल तापमानाचा पारा सातत्याने 31 अंश सेल्सियसपेक्षाही अधिक राहतो आहे. उन्हाळ्यात पडणाऱ्या उन्हाची जाणीव ऑक्‍टोबरमध्येच नाशिककर घेत आहेत. कमाल पारा 31.7 अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचले असून ही ऑक्‍टोबर महिन्यात सर्वात कमालीची नोंद झाली आहे. ऑक्‍टोबर महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ऑक्‍टोबर हिट म्हटले जाते. परंतु उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यातच रात्रीचा उकाडाही वाढला आहे. त्यामुळे नाशिककर थंडीच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

आठवडयातील कमाल पारा (अंश सेल्सियसमध्ये) 
15 ऑक्‍टोबर : 31.3 
14 ऑक्‍टोबर : 31.7 
13 ऑक्‍टोबर : 31.5 
12 ऑक्‍टोबर : 31.0 
11 ऑक्‍टोबर : 31.3 
10 ऑक्‍टोबर : 31.5 
9 ऑक्‍टोबर : 31.6 
8 ऑक्‍टोबर : 31.6 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com