कुत्रे आले आडवे; दुचाकीस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नाशिक : गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कुलच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातामध्ये भरधाव वेगातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. भूषण रमेश गवळी (41, रा. निरंजन अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, शरणपूर रोड) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. गेल्या बुधवारी (ता.9) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भूषण गवळी हे त्यांच्या होंडा शाईन दुचाकीवरून (एमएच 41 एल 8996) आनंदवल्लीकडून जेहान सर्कलकडे भरधाव वेगात येत होते. भोसला स्कुलच्या प्रवेशद्वारासमोर त्यांच्या दुचाकीसमोरून कुत्रे आडवे गेले.

नाशिक : गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी स्कुलच्या प्रवेशद्वारासमोर कुत्रे आडवे आल्याने झालेल्या अपघातामध्ये भरधाव वेगातील दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. भूषण रमेश गवळी (41, रा. निरंजन अपार्टमेंट, होलाराम कॉलनी, शरणपूर रोड) असे दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. गेल्या बुधवारी (ता.9) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भूषण गवळी हे त्यांच्या होंडा शाईन दुचाकीवरून (एमएच 41 एल 8996) आनंदवल्लीकडून जेहान सर्कलकडे भरधाव वेगात येत होते. भोसला स्कुलच्या प्रवेशद्वारासमोर त्यांच्या दुचाकीसमोरून कुत्रे आडवे गेले. त्यावेळी त्यांनी कुत्रे वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी झाडावर जाऊन आदळली. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात स्वत÷:च्या मृत्युस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक डी.एल. माळी हे अधिक तपास करीत आहेत. भूषण गवळी यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/accident/crimenews