दुभाजकावर कार धडकून एक ठार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर भरधाव वेगातील कार उड्डानपुलावरील दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात बुधवारी (ता.30) पहाटेच्या सुमारास घडला. देवंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग (30, रा. आदिलनगर, लखनऊ, उत्तरप्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. जितेंद्र सिंग, सरिता चव्हाण, राखी सिंग व आयुष सिंग हे गंभीर जखमी आहेत. भानुप्रताप सिंग हे लखनऊ येथून नाशिककडे येत असताना, बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलावर अपघात झाला.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर भरधाव वेगातील कार उड्डानपुलावरील दुभाजकावर धडकून झालेल्या अपघातात 1 ठार तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात बुधवारी (ता.30) पहाटेच्या सुमारास घडला. देवंद्र प्रतापसिंग भानुप्रतापसिंग (30, रा. आदिलनगर, लखनऊ, उत्तरप्रदेश) असे ठार झालेल्याचे नाव आहे. जितेंद्र सिंग, सरिता चव्हाण, राखी सिंग व आयुष सिंग हे गंभीर जखमी आहेत. भानुप्रताप सिंग हे लखनऊ येथून नाशिककडे येत असताना, बुधवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डीफाटा येथील उड्डाणपुलावर अपघात झाला. त्यांचे भरधाव वेगातील इनोव्हा कारवरील (युपी 32 एमएम 2055) नियंत्रण सुटून ती उड्डाणपुलावरील दुभाजकावर आदळली. यात भानुप्रताप गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान, भानुप्रताप यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषीत केले. तर जखमी चौघांवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashik/accident/crimenews