भावाच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप 

Residential photo
Residential photo

नाशिक : आजीशी वाद घालणाऱ्या भावाला जाब विचारला असता, त्याने चाकूने वर्मी घाव करीत खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सागर बालाजी एखंडे (रा. श्रमिकनगर, गंजमाळ) असे आरोपीचे नाव असून सदरची घटना 3 सप्टेंबर 2017 रोजी घडली होती. 

आजी बबाबाई गायखे यांनी आरोपी सागर एखंडे यास शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात ठेवून आरोपी सागर एखंडे हा 3 सप्टेंबर 2017 च्या मध्यरात्री आजीला जाब विचारत तिच्याशी वाद घालत होता. त्यावेळी भाऊ शिवराम बालाजी एखंडे याने आजी बबाबाई गायखे यांची बाजू घेत आरोपी सागर यास बोलत होता. त्याचा राग आरोपीला आला आणि त्याने त्याच्याकडील चाकूने शिवराम यांच्या छातीवर वर्मी घाव घातला. यात वर्मी घाव बसल्याने शिवराम याचा मृत्यु झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीसात आरोपी सागर एखंडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. जोनवाल यांनी गुन्ह्याचा तपास करीत जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 
सदरील खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायधीश जी.पी. देशमुख यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. श्रीमती दीपशिखा भिडे यांनी कामकाज पाहताना साक्षीदार तपासले. यात आरोपी सागर याच्याविरोधात पुरावे सिद्ध झाल्याने न्यायधीश देशमुख यांनी जन्मठेप व 10 हजार रुपये दंड; दंड न भरल्यास 3 महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार आर.एस. पिरजादे, महिला हवालदार पी.आर. चौधरी, एस.आर. साळवे यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com