धनादेश वटविण्यात हलगर्जीपणा; चार बॅंकांना ग्राहक मंचाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नाशिक, : घेतलेल्या मालापोटीचा चेक संबंधिताच्या नावे बॅंकेच्या चेकबॉक्‍समध्ये वटविण्यासाठी टाकला असता, तो अज्ञात संशयिताने परस्पर खाडाखोड करून दुसऱ्याच बॅंकेतून वटवून घेतल्याप्रकरणी ग्राहक मंचाने चार बॅंकांना व्यासासह रक्कम देण्याचा दणका दिला. विशेषत: धनादेशावर खाडाखोड करून दुसऱ्याच्या नावे असलेला व दुसऱ्याच बॅंकेत धनादेश वटविल्याचा प्रकार घडल्याचे आश्‍चर्यही ग्राहक मंचाने व्यक्त केले. 

गणेशमल जगदीशप्रसाद राठी (रा. सिडको) यांनी मयुरेश प्रोटेन्झ यांच्याकडून माल खरेदी केला होता. त्या मालाचे येस बॅंकेचा 80 हजार 850 रुपयांचा धनादेश तयार केला आणि मयुरेश प्रोटेन्झ यांचे माटुंगा येथील युनियन बॅंकेत खाते असल्याने श्री. राठी यांनी जेलरोडच्या युनिट बॅंकेच्या चेक डिपॉझिट बॉक्‍समध्ये सदरील रकमेचा चेक वटविण्यासाठी टाकला होता. मात्र अज्ञात संशयिताने सदरचा धनादेश घेऊन त्यावरील मयुरेश प्रोटेन्झ हे नाव खोडून त्यावर प्रिया श्रीराम वाघमारे या नावाने नाशिकरोडच्या स्टेट बॅंकेच्या शाखेत डिपॉझिट केला. त्या बॅंकेने क्‍लेरिंगसाठी नाशिक-पुणा रोडवरील शिवाजीनगरच्या स्टेट बॅंकेच्या शाखेत पाठविलाव व वटविला. 
तक्रारदार राठी यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात तक्रार केली व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडेही अर्ज केला. ऍड. प्रवीण पारख यांनी युक्तिवाद करीत कामकाज पाहिले. यावेळी मंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी याबाबत निकाल दिला. त्यानुसार चारही बॅंकांनी धनादेश वटविण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल तक्रारदार राठी यांना धनादेशाची रक्कम 10 टक्के व्याजासह द्यावी, मानसिक व शारीरिक त्रास झाल्याबद्दल 5 हजार रुपये व खर्चापोटी 3 हजार रुपये देण्याचे आदेश दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews