दोघांवर चॉपरने वार करून केले जखमी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

नाशिक, : उपनगर परिसरात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोघांना संशयितांनी चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना घडली. 
दीपक भाऊसाहेब जाधव (20, रा. लोखंडे मळा, हनुमंतनगर, जेलरोड), विपुल प्रमोद चंद्रमोरे (19, रा. चंद्रकमल सोसायटी, जेलरोड) असे दोघा संशयितांची नावे आहेत. 

भूषण प्रभाकर वाबळे (21, रा. अप्पू चौक, के कॉलनी, उपनगर) या युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.24) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भूषण व त्याचा मित्र प्रसाद वसंत जुन्नरे (19) हे दोघे मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी उपनगरच्या साईबाबा मार्केटमधील पूजा बेकरी येथे गेले होते. त्यावेळी संशयित दीपक जाधव, विपुल चंद्रमोरे हे दोघे त्याठिकाणी आले. त्यांनी दुकानदाराकडे सिगारेट मागितले असता, त्यावेळी भूषण याने त्यांच्याकडे पाहिले. त्याचा राग येऊन संशयितांनी भूषणला अश्‍लिल भाषा वापरत शिवीगाळ केली. तसेच हातातील लोखंडी कडे व चॉपरने मारून भूषणचे डोके फोडले. तर प्रसाद जुन्नरे यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून कानाजवळ चॉपर मारून जखमी केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्या त आला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews