अश्‍विननगरमध्ये घरफोडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नाशिक : सिडकोतील अश्‍विननगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना घरातील जागे झाल्याने एलइडी टीव्ही चोरून पळ काढावा लागल्याची घटना घडली. सुरेशभाई बाबुभाई धाणानी (रा. अश्‍विननगर, सिंबॉयसिस कॉलेजजवळ, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.25) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटवरून उडया घेत प्रवेश केला. सेफ्टी दरवाजाची जाळी तोडून हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर ते घरात घुसले. एलइडी टीव्ही त्यांनी चोरीसाठी काढला. परंतु चोरट्यांची चाहूल घरातील मंडळींना आली.

नाशिक : सिडकोतील अश्‍विननगरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना घरातील जागे झाल्याने एलइडी टीव्ही चोरून पळ काढावा लागल्याची घटना घडली. सुरेशभाई बाबुभाई धाणानी (रा. अश्‍विननगर, सिंबॉयसिस कॉलेजजवळ, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या रविवारी (ता.25) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटवरून उडया घेत प्रवेश केला. सेफ्टी दरवाजाची जाळी तोडून हॉलच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडला. त्यानंतर ते घरात घुसले. एलइडी टीव्ही त्यांनी चोरीसाठी काढला. परंतु चोरट्यांची चाहूल घरातील मंडळींना आली. त्याची जाणीव होताच चोरट्यांनी टीव्ही घेऊन पलायन केले. यातील एक संशयित गेटवरून उडी घेताना जखमी झाल्याचे श्री.धानाणी यांनी पाहिले. याप्रकरणी अंबड पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews

टॅग्स